AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Khanvilkar: नवऱ्यापासून वेगळं राहणाऱ्या अमृता खानविलकरकडे कोट्यवधींची संपत्ती; मुंबई-पुण्यात घरं

Amruta Khanvilkar's Net Worth: अभिनेत्री अमृता खानविलकरने चित्रपट, मालिका, शोज आणि वेब सीरिजमध्ये काम करून बरीच संपत्ती कमावली आहे. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अमृता एका चित्रपटासाठी किती मानधन घेते, ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 05, 2026 | 12:24 PM
Share
मराठीसोबतच हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत असल्याचा खुलासा त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. वेगळे राहत असले तरी घटस्फोटाबद्दल अद्याप त्यांनी काही निर्णय घेतला नसल्याचंही स्पष्ट केलंय.

1 / 5
मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याचा ठसा उमटविला आहे. एका मराठी चित्रपटासाठी ती जवळपास दहा ते बारा लाख रुपये मानधन स्वीकारते. तर शोजमधील एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड लाख रुपये फी घेते.

2 / 5
एका मुलाखतीत अमृता म्हणालेली, "जर मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले नसते तर मी कमावलेल्या पैशांची उधळपट्टी केली असती. मला कधीच पैशांची किंमत कळली नसती. माझ्याकडे मर्सिडीज किंवा ऑडीसारख्या महागड्या गाड्या नाहीत. मी विकत घेऊ शकत नाही, असं नाही. पण मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही."

3 / 5
"मला घरांमध्ये गुंतवणूक करायला खूप आवडतं. माझं पुण्यात एक घर आहे, तर मुंबईत दोन घरं आहेत. पण आता पुरे झालं. मला जे काही आवडतं, ते सर्व मी केलं आहे. त्यामुळे माझ्याकडे आता हे आहे, त्यात मी सुखी आणि समाधानी आहे", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

4 / 5
अमृता खानविलकरडे 30 ते 50 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. मराठी आणि हिंदी चित्रपट, विविध शोज, ब्रँड एंडोर्समेंट, साड्यांचा बिझनेस यातून तिची कमाई होते. तर अमृताचा पती हिमांशू मल्होत्रासुद्धा अभिनेताच आहे. एका शोदरम्यान या  दोघांची भेट झाली होती.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी