AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने खरेदीत भारतीयांचा हात आखडता, मागणीत तब्बल 29% घट, ही कारणे आली पुढे

भारतातील दागिन्यांची एकूण मागणी २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत १२५ टनांवरून २० टक्क्यांनी घटून ९९.९ टन झाली. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे मूल्याच्या दृष्टीने ती १६ टक्क्यांनी वाढून १,४८,७०० कोटी रुपयांवर पोहोचली.

| Updated on: Nov 03, 2026 | 8:54 PM
Share
भारतात जुलै- सप्टेंबरातील तिमाहीत सोन्याची मागणी वार्षिक आधारावर २९ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह १६२.५ टन राहीली. इम्पोर्ट ड्यूटीतील वाढ, किंमतीतील उसळी आणि पंतप्रधान मोदी यांनी सोने खरेदी लगाम लावण्याचे आवाहन यामुळे सोन्याची मागणी घसरली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने (WGC)  मंगळवारी ही माहिती दिली.WGC च्या अंदाजानुसार या संपूर्ण वर्षात भारतात सोन्याची मागणी  ६२५  ते  ६७५ टन राहू शकते.

1 / 5
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने मंगळवारी जारी केलेल्या तिसऱ्या तिमाही २०२६ मध्ये सोन्याच्या मागणीच्या अंदाजावरील रिपोर्टनुसार २०२५ मध्ये याच तिमाहीत सोन्याची मागणी २२९.८ टन होती. मात्र, सोन्याच्या मागणीची व्हॅल्यू तीन टक्के वाढून २,४१,९०० कोटी रुपये झाली, जी गेल्या वर्षीच्या तिमाहीत २,३५,०९० कोटी रुपये होती. या दरम्यान सोन्याचा सरासरी भाव ४२६२ अमेरिकन डॉलर प्रति औंस ( १,४८,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम ) होता. २०२५ मध्ये यात कालावधीत हा भाव ३,४५७ अमेरिकन डॉलर ( १,०२,२८७ रुपये ) होता. या किंमतीत इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी सामील नाही.

2 / 5
भारतात एकूण ज्वेलरीची मागणी २०२५ च्या दुसरी तिमाहीच्या १२५ टनाच्या तुलनेत २० टक्के घटून ९९.९ टन राहील. मात्र, जास्त किंमतीमुळे व्हॅल्यूच्या तुलनेत ही १६ टक्के वाढून १,४८,७०० कोटी रुपये झाली.  डब्ल्युजीसीचे भारताचे रिजनल सीईओ सचिन जैन यांनी म्हटले आहे की जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतात सोन्याची मागणी सतत मजबूत बनत आहेत. मात्र, जास्त किंमतीने ग्राहकांच्या खरेदीच्या व्यवहाराला प्रभावित केले आहे.

3 / 5
सचिन जैन यांनी सांगितले की एकूण मागणी १६२.५ टन राहीली आणि याची व्हॅल्यू २,४१,९०० कोटी रुपयांपर्यंत पोहचली. यावरून असे दिसून येते की, ग्राहक सोन्याला प्राधान्य देत आहेत आणि खरेदी करताना परवडणारी किंमत आणि दीर्घकालीन मूल्य यांचा समतोल साधत आहेत. ते म्हणाले की, हे विशेषतः दागिन्यांच्या क्षेत्रात अधिक स्पष्टपणे दिसून आले, जिथे मागणीत वार्षिक २० टक्क्यांनी घट झाली, तर मूल्यात १६ टक्क्यांनी वाढ झाली.

4 / 5
तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे दागिन्यांच्या मागणीला आधार मिळाला आणि पुढे ढकललेल्या काही खरेदीलाही गती मिळाली. लग्न आणि सणांसाठीच्या खरेदीनेही मागणीला आधार दिला, विशेषतः दक्षिण भारतात, जिथे प्रमुख सण ऑगस्ट महिन्यात आले होते. वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, ग्राहक अधिकाधिक विचारपूर्वक खरेदी करत आहेत आणि जुने सोने देऊन नवीन दागिने घेण्याची योजना आखत आहेत. सोन्याच्या दागिन्यांबद्दलची त्यांची पसंती कायम आहे असेही सचिन जैन यांनी म्हटले आहे.

5 / 5
Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले