दाऊदचा साथीदार सलीम डोला याच्यावर ED चा पंजा, मुंबई ते गुजरातमध्ये 20 ठिकाणांवर छापा…

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि ड्रग तस्कर सलीम डोला याच्या नेटवर्क ईडीवर मोठी कारवाई केली आहे. मुंबई, सूरत, अंकलेश्वर आणि राजकोट अशा २० ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

दाऊदचा साथीदार सलीम डोला याच्यावर ED चा पंजा, मुंबई ते गुजरातमध्ये 20 ठिकाणांवर छापा...
Dawood's associate, Salim Dola, has been extradited from Turkey to India
| Updated on: Jun 02, 2026 | 3:43 PM

सक्तवसुली संचालनालयाने (ED) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम इस्माईल डोला याच्या नेटवर्कवर मोठी कारवाई सुरु केली आहे. ईडीच्या मुंबई झोनल ऑफीसच्या टीमने मुंबई, सुरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह २० ठिकाणांवर एकसाथ छापेमारी केली आहे. ही कारवाई मनी लाँड्रींग आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीशी संबंधित प्रकरणांवर केली जात आहे.

ईडीची ही कारवाई मादक पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या विरोधात केली जात आहे, याचे संचलन सलीम इस्माईल डोला आणि त्याचे सहकारी करत होते. तपास यंत्रणांच्या मते हे नेटवर्क अनेक देशांमध्ये पसरलेले होते आणि हजारो कोटी रुपयांच्या ड्रग व्यापाराशी जोडलेले आहे. अलिकडेच भारत सरकारने सलीम डोला याला तुर्कीये ( तुर्की ) वरुन प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणले आहे.

सलीम डोला याला फरार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी मानले जात आहे. तपास यंत्रणांचा दावा आहे की तो प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग तस्करीचे नेटवर्क चालवत आला होता. त्याच्या नेटवर्कच्या द्वारे मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती, ज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध कमाई केली जात होती.

या संपूर्ण नेटवर्कचा हिस्सा असलेल्या लोकांभोवती आणि संस्थांवर ईडीची कारवाई केंद्रित आहे. यात ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रीकर्सर केमिकल्सचे सप्लायर, केमिकल व्यापाराशी संबंधित दलाल, सिंथेटिक ड्रग मेफेड्रोन ( एमडी ) चे निर्माता आणि वितरकांचा समावेश आहे. याशिवाय हवावा ऑपरेटर्स आणि बेनामी संपत्तीच्या मालकांची देखील चौकशी होत आहे.

ही मनी लाँड्रींगची चौकशी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA), 2002अंतगर्त सुरु झाली आहे. याची सुरुवात मुंबईत सलीम डोला आणि अन्य आरोपींच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयरच्या आधारे सुरु झाली होती. या प्रकरणात नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या तस्करीचे आरोप आहेत.

तपासादरम्यान ईडीला एक खूप संघटित आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या नेटवरकचे पुरावे मिळाले आहे. तपास यंत्रणाच्या मते ही गँग प्रीकर्सर केमिकल्सची खरेदी गुप्त रुपाने मेफेड्रोन ( एमडी ) ची निर्मिती, राज्यांच्या दरम्यान ड्रग्सचा पुरवठा आणि परदेशात तस्करी सारख्या कामांमध्ये सामिल होती. या द्वारे मोठ्या प्रमाणात अवैध पैसा निर्माण केला जात होता.

तपासात हे देखील पुढे आले आहे की गुन्ह्यातून मिळालेला पैसा हवाला चॅनलद्वारे जिकडे- तिकडे पाठवला जात होता,ज्यामुळे त्याची खरी ओळख लपवता येत होती. या पैशाला विविध लोक आणि सहकाऱ्यांच्या नावावर चल- अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरले जात होते. अनेक गुंतवणूक बेनामी नावाने केल्या जात होत्या असेही संकेत मिळाले आहेत.

ईडीची टीम सध्या संपूर्ण नेटवर्कच्या वित्तीय घडामोडींचा सखोल तपास करत आहे. तपासाची व्याप्ती केमिकल फॅक्ट्रींपासून ते वित्तीय देवाण-घेवाण करणाऱ्या लोकांपर्यंत पसरली आहे. यात अकाऊंटन्ट, चार्टर्ड अकाऊंटेन्ट ( सीए ) आणि अन्य वित्तीय सल्लागारांची भूमिका तपासली जात आहे.

Follow Us