शादी डॉट कॉम वेबसाईटवर ओळख, डॉक्टर युवतीचा टीव्ही कलाकाराकडून विनयभंग; आरोपीला अटक

| Updated on: Feb 13, 2022 | 9:08 AM

त्यामुळे प्रत्येकाने असल्या वेबसाईटपासून काळजी घ्यावी, तसेच खात्री असल्याशिवाय अशा तरूणींशी किंवा तरूणांशी चर्चा करू नये.

शादी डॉट कॉम वेबसाईटवर ओळख, डॉक्टर युवतीचा टीव्ही कलाकाराकडून विनयभंग; आरोपीला अटक
आरोपी, जितेंद्र पोळ
Follow us on

कोल्हापूर – शादी डॉट कॉम वेबसाईटवरून (website)ओळख झाल्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची आतापर्यंत अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यामुळे तिकडे अनेकांना ऑनलाईन (online) प्लॅटफॉर्म पासून लांब आहेत. कारण तिथं आपल्या गेल्यानंतर आपल्याला चांगला शिकलेला किंवा योग्य जोडीदार मिळेल असं अनेकांना वाटत असतं. परंतु आत्तापर्यंत अनेकांच्या पदरी निराशा पडली असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर अनेकांचं चांगलं सुध्दा झाल्याची अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे तिथं किती जोखीम स्विकारायची हे तुम्ही ठरवा ? कोल्हापूरात (kolhapur) एका डॉक्टर तरूणीची एका टिव्ही कलाकाराने (tv actor)फसवणूक केल्याचं प्रकरण नुकतंच उजेडात आलं आहे. शादी डॉट कॉम वेबसाईटवरून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर कलाकाराने त्या तरूणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तरूणाचं नाव जितेंद्र पोळ असून लक्ष्मीपुरी पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

शादी डॉट कॉम वेबसाईटवरून डॉक्टर तरूणीची आणि टिव्ही मालिकेती कलाकार जितेंद्र पोळ याच्याशी ओळख झाली होती. तिथून दोघांनी एकमेकांशी चॅट केल्याचं देखील समजतंय. म्हणजे करिअर भविष्य याबाबत दोघांचं बोलण झालं होत. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत जितेंद्र पोळ याने डॉक्टर तरूणीचा विनयभंग केला असा आरोप डॉक्टर तरूणीने केला आहे. त्याचबरोबर डॉक्टर तरूणीला त्रास देखील दिला असल्याचे तक्रारीत म्हणटले आहे अशी माहिती कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनमधून मिळत आहे. पोलिसांना तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ तरूणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचे समजते. त्याचबरोबर हा तरूण एका वाहिनीतील प्रसिद्ध धार्मिक मालिकेत काम करत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याने हे खरंच असं काय केलं आहे का ? किंवा त्याच्यावर असे आरोप केले जात आहेत या प्रकरणाची पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

शादी डॉट कॉम वेबसाईटवर का होते फसवणूक

त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमची नोंदणी करता, त्यानंतर तिथं तुम्हाला तुमच्या प्रोफाईल संबंधित अधिक स्थळ दिसतात. तुम्हाला तिथं कोणीतरी पसंती दाखवतं किंवा तुम्ही त्याला पसंती दाखवता. त्यानंतर तुमचं तिथून बोलणं सुरू होतं. तिथं पुरूषचं फसवणूक करतात असं काही नाही, अनेक महिलांनी सुध्दा त्या संकेत स्थळावरून अनेकांची फसवणूक केली आहे. अनेक महिलांनी तरूणांची पैशासाठी फसवणूक केली असल्याचे पाहायला मिळते. अनेकजण तिथं आपलं चातुर्य दाखवून फसवणूक करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने असल्या वेबसाईटपासून काळजी घ्यावी, तसेच खात्री असल्याशिवाय अशा तरूणींशी किंवा तरूणांशी चर्चा करू नये.

नम्रता मल्लाची वेस्टर्न विअर घाग-यात अनोखी अदा, डोळ्याच्या नजरेने चाहते झाले फिदा; व्हायरल फोटो पाहिले का ?

पलक तिवारीच्या फोटोवर सलमानच्या गर्लफ्रेंडची कमेंट, जाणून घ्या काय लिहिलंय ?

लहान बाळांना थंडीचा त्रास होत असेल तर या टिप्स वापरा, बाळाला नक्की आराम मिळेल