Umar House Demolished : मोठी Action, दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या दहशतवादी उमरच घर उडवलं, VIDEO

Umar House Demolished : दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासात पुलवामाचा रहिवाशी डॉ.उमर मोहम्मदच नाव समोर आलेलं. जैश-ए-मोहम्मद सोबत मिळून त्याने हा कट रचलेला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. यात उमर स्वत: सुद्धा मारला गेला.

Umar House  Demolished : मोठी Action, दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या दहशतवादी उमरच घर उडवलं, VIDEO
Umar House Demolished
Updated on: Nov 14, 2025 | 8:39 AM

राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची योजना बनवत होते, तपास यंत्रणांच्या चौकशीत हे समोर आलय. तपास यंत्रणांकडून स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकारची कारवाई सुरु आहे. याच कारवाई अंतर्गत दहशतवादी उमरच घर जमीनदोस्त करण्यात आलं.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून देशभरात छापेमारीची कारवाई सुरु आहे. दहशतवादी उमरने स्फोटाचा कट प्रत्यक्षात आणला. पण त्याचे अन्य साथीदारही आहेत. त्यातल्या काही जणांना अटक झाली आहे. उमरचा ग्रुप मागच्या दोन वर्षांपासून या स्फोटाची योजना बनवत होता. पोलिसांनी उमरचा भाऊ त्याची आई दोघांना ताब्यात घेतलं आहे.

उमरच्या आईने काय मान्य केलं?

उमरच्या आईने पोलीस चौकशीत कबूल केलं की, त्यांना माहित होतं, त्यांचा मुलगा कट्टरपंथी बनलाय. अनेक दिवस त्याच्यासोबत आईच बोलण व्हायचं नाही. स्फोट घडवण्याआधी उमरने कुटुंबियांना कॉल करु नका असं सांगितलं होतं. कुटुंबाने, उमरमध्ये झालेल्या या बदलाविषयी, त्याच्या हालचालींबद्दल पोलिसांना कुठलीही माहिती दिली नव्हती.


कुठे-कुठे स्फोट घडवण्याची त्यांची प्लानिंग?

दिल्ली स्फोटात पुलवामात राहणाऱ्या उमर मोहम्मदच नाव समोर आलेलं. या स्फोटात त्याचा सुद्धा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं. उमर मोहम्मद पेशाने एक डॉक्टर होता. दुसऱ्यांचा जीव वाचवणं हे त्याचं काम होतं. पण तो जीवघेण्याच काम करत होता. उमर जैश ए मोहम्मदच्या मॉड्यूलशी संबंधित होता. स्फोटाआधी पोलीस आणि ATS कडून उमरच्या गँगमधील अनेक सदस्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांच्याजवळून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. पोलीस सध्या उमरच्या साथीदारांची कसून चौकशी करत आहेत. किती मोठ्या लेव्हलच प्लानिग होतं, ते शोधून काढलं जात आहे. कुठे-कुठे स्फोट घडवण्याची त्यांची प्लानिंग होती त्याचा शोध घेतला जात आहे.