नालासोपाऱ्यात 80 वर्षीय महिलेची हत्या, भाऊबीजेलाच वृद्धेला राहत्या घरी कोणी संपवलं?

आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलकापुरी येथील लक्ष्मी निवास या इमारतीच्या तळ मजल्यावर 80 वर्षीय वाली शिवसागर राहत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी वसई विरार परिसरात दोन महिलांचे मृतदेह आढळले आहेत.

नालासोपाऱ्यात 80 वर्षीय महिलेची हत्या, भाऊबीजेलाच वृद्धेला राहत्या घरी कोणी संपवलं?
नालासोपाऱ्यात वृद्धेची हत्या
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 9:00 AM

नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात 80 वर्षीय महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध महिलेची राहत्या घरी हत्या करुन आरोपी फरार झाला. याबाबत आचोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

वाली शिवसागर असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलकापुरी येथील लक्ष्मी निवास या इमारतीच्या तळ मजल्यावर 80 वर्षीय वाली शिवसागर राहत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी वसई विरार परिसरात दोन महिलांचे मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी नालासोपारा येथील वृद्धेची हत्या करण्यात आली आहे, तर विरार येथील महिलेची हत्या आहे की आत्महत्या, यावर पोलीस तपास करत आहेत.

शेजाऱ्यांना मृतदेह आढळला

शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाली शिवसागर यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर शेजाऱ्यांनी आचोळे पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर आचोले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला.

डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार

वृद्ध महिला एकटीच घरात राहत होती. तिच्या डोक्यावर कोणत्या तरी अवजड वस्तूने प्रहार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

CCTV | पाण्याच्या बहाण्याने वॉचमन घरात शिरला, वृद्धेला बांधून दरोडा, पाडव्याला उल्हासनगरात खळबळ

अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू; नवविवाहितेसोबत नेमकं काय घडलं?

वसईत अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक, आरोपी अटकेत

Follow Us