टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता प्रकरण थेट… रात्रभरात मोठ्या हालचाली

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याने खळबळ उडाली असून, बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्याने राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेणे आणि बिश्नोई गँगशी संबंध तपासणे हे प्रमुख आव्हान आहे.

टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता प्रकरण थेट... रात्रभरात मोठ्या हालचाली
tiger shroff
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 9:57 AM

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर काल अचानक हल्ला झाला. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ बचावला आहे. मात्र, जुहू सारख्या वर्दळीच्या ठिकाणी टायगरवर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील आरोपी फरार झाले आहेत. त्यांना अजूनही पोलिसांनी अटक केली नाही. दुसरीकडे बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारही सक्रिय झालं असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी राज्य सरकारने हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग केले आहे. जुहू पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास आता क्राईम ब्रँच करणार आहे. बिश्नोई गँगशी संबंधित अनेक प्रकरणांचा तपास यापूर्वी क्राईम ब्रँचकडून करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचा तपासही क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेतला. पोलीस रात्रभर या प्रकरणाचा तपास करत होते.

Loading...

गुन्हे दाखल

फायरिंग करणाऱ्या तीन अज्ञात शूटर्सचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. शूटर्सचा बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का? याचाही तपास क्राईम ब्रँचकडून होण्याची शक्यता आहे. तर, टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 3(5) आणि शस्त्रास्त्र कायद्यातील कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नानावटी बाहेर मोठा बंदोबस्त

दरम्यान, टायगर श्रॉफच्या कारवर जुहूमध्ये गोळीबार करण्यातक आला होता. यात टायगरचा ड्रायव्हर फिरदौस जखमी झाला असून त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नानावटी रुग्णालयाबाहेर सुरूक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. टायगरचा ड्रायव्हर फिरदौस याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः कार चालवली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ड्रायव्हरची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे जुहू परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारामागील कारण आणि आरोपींबाबत अधिक माहिती अद्याप स्पष्ट नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us