Tiger Shroff : दुसऱ्या जखमीला मध्यरात्रीच केईएमला हलवले, हृदय आणि फुफ्फुसांना… हेल्थ अपडेट काय?

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यात जखमी झालेल्या उमेश चौहानला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. सुरुवातीला हृदय-फुफ्फुसाला इजा झाल्याची भीती असली तरी, डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आणि गंभीर धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, पुढील तपासण्यांनंतर उपचारांची दिशा ठरवली जाईल.

Tiger Shroff : दुसऱ्या जखमीला मध्यरात्रीच केईएमला हलवले, हृदय आणि फुफ्फुसांना... हेल्थ अपडेट काय?
Tiger Shroff
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 12:45 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर काल मुंबईत बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातून टायगर थोडक्यात बचावला असला तरी या हल्ल्यात दोनजण जखमी झाले आहेत. टायगरचा ड्रायव्हर फिरदौस आणि स्थानिक ब्लॉगर उमेश चौहान या हल्ल्यात जखमी झाले आहेत. फिरदौस याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश चौहान याला रात्रीच केईएममध्ये आणण्यात आलं आहे. केईएममध्ये उमेशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

केईएम रुग्णालयाने उमेश चौहान याच्या आरोग्याची माहिती दिली आहे. 18 ऑक्टोबर रोजी उमेश चौहान गोळी लागून जखमी झाला. त्याला सुरुवातीला तातडीने जुहूच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर मध्यरात्रीच त्याला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. गोळीच्या जखमेमुळे त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना इजा झाली नाही. केईएम रुग्णालयातील आपत्कालीन अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाने दिली आहे.

Loading...

प्रकृती स्थिर, पण…

जनरल सर्जरी विभागाच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हृदय आणि छातीच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. चौहानची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील तपासण्या आणि वैद्यकीय अहवालानुसार उपचारांची दिशा ठरण्यात येणार असल्याचंही केईएम प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

कार्यक्रम शूट करण्यासाठी आला…

दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी गोळीबार करून फरार होताना दिसत आहे. या गोळीबारात उमेश चौहान नावाचा एक 35 वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याचं दिसत आहे. उमेशच्या छातीच्या 2 इंच खाली त्याला गोळी लागली. त्यामुळे त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सुदैवाने त्याच्या हृदय आणि फुफ्फुसाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उमेश चौहान हा एक ब्लॉगर आहे. तो टायगर श्रॉफचा कार्यक्रम शूट करण्यासाठी आली असता ही घटना घडली.

कोटा रेल्वे स्थानकातून तिघे अटकेत

दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोरस्ने कोटा रेल्वे स्थानकातून तीन जणांना अटक केली आहे. या तिघांचा टायगरवरील हल्ल्याशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. हे तिघेही मुंबईवरून दिल्लीला जात होते. त्यावेळी कोटा रेल्वे स्थानकातून या तिघांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us