Mumbai Crime : जेजे हॉस्पिटलमधील आयसीयूतील धक्कादायक प्रकार, आई तिला ५ मिनिटं सोडून बाहेर गेली तितक्यात..

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. नामांकित रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली असून सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Mumbai Crime : जेजे हॉस्पिटलमधील आयसीयूतील धक्कादायक प्रकार, आई तिला ५ मिनिटं सोडून बाहेर गेली तितक्यात..
| Updated on: Oct 10, 2023 | 2:04 PM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : शहरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. मात्र आता रुग्णालयही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील (mumbai crime) नामांकित जे.जे. रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या आजारी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचं उघडकीस आले.

पीडित मुलीच्या आईने जे. जे. मार्ग पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत या प्रकाराबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि हे दुष्कृत्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला (sweeper arrested) अटक केली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

घरच्यांशी वाद झाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 15 वर्षांची असून ती आई-वडिलांसोबत मुंबईतील उपनगरांपैकी एक असलेल्या मानखुर्द येथे रहात होती. मात्र काही दिवसांपूर्वी ते सर्वजण तेथील जागा सोडून दुसरीकडे रहायला गेले. पण त्या मुलीला मूळच्या जागीच पुन्हा रहायला जायचे होते.

याच मुद्यावरून तिचा पालकांशी वाद झाला होता. यामुळे रागाच्या बरात तिने तिच्या वडिलांचे मानसिक आजारावरचे औषध सेवन केले आणि तिची प्रकृती अतिशय बिघडली. त्यामुळे तिला उपचारांसाठी तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला आयसीयू (ICU) मध्ये ठेवण्यात आले होते. तिची आई तिच्यासोबतच रुग्णालयात थांबली होती.

आई तिला ५ मिनिटं सोडून बाहेर गेली तितक्यात..

स्वच्छता कर्मचारी असणारा आरोपी हा बेडशीट्स बदलण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी ( रविवारी) मुलीची आई काही कामासाठी ५ मिनिटं बाहेर गेली होती. तीच संधी साधून तो आत शिरला आणि त्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले. आई परत आल्यावर भेदरलेल्या मुलीने कसाबसा सगळा प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने तातडीने जे.जे. मार्ग पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.