Pune crime | शीतपेयांमधून दारू पाजत महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

| Updated on: Jan 09, 2022 | 1:00 PM

आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी शीतपेयांमध्ये दारूमिसळून ते शीतपेय पाजले. त्यानंतर फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पतीला पाठवून देत बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी थांबवण्यासाठी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने जबरदस्तीने वारंवार लैंगिक संबंध ठेवले.

Pune crime | शीतपेयांमधून दारू पाजत महिलेसोबत केले हे कृत्य
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us on

पिंपरी – तळेगाव दाभाडे येथे शीतपेयांमध्ये दारू मिक्स करत महिलेला पाजली, त्यानंतर महिलेचे अश्लील फोटो काढले. ते फोटो तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमक काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी शीतपेयांमध्ये दारूमिसळून ते शीतपेय पाजले. त्यानंतर फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पतीला पाठवून देत बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी थांबवण्यासाठी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने जबरदस्तीने वारंवार लैंगिक संबंध ठेवले. तळेगाव दाभाडे तसेच चाकण येथे वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर आरोपीने फिर्यादीला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तळेगाव दाभाडे व चाकण येथे 20 एप्रिल 2019 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दररोज 40,000 Corona रुग्णांची नोंद होतेय त्यामुळं महाराष्ट्रात निर्बंध गरजेचे होते – राजेश टोपे

Pune crime | पुणे पोलिसांची जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी, 60 ते 70 जणांच्या पथकाची कारवाई

BJP vs. Shiv Sena|भाजप नेत्यांना राजकीय बाळकडू कमी पडले; सोमय्या भरसटलेले, कुठली गोळी घेतात, पेडणेकरांची टीका