Pune crime | पुणे पोलिसांची जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी, 60 ते 70 जणांच्या पथकाची कारवाई

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग झालाय आहे. पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे.

Pune crime | पुणे पोलिसांची जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी, 60 ते 70 जणांच्या पथकाची कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणे- पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात जळगावातील ॲड विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजपनेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. तपासासाठी जळगावात पोहचलेल्या पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा समावेश आहे. जळगावातील ॲड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याची चर्चा आहे.

गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होईल या प्रकरणातील मूळ फिर्यादी ॲड विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे . गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच, असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे गिरीश महाजन यांना मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करायची होती मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले.

मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वाद गिरीश महाजन यांच्यावर जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातबाबत दाखल गुन्हा आहे. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग झालाय आहे. पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. ॲड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . जळगावातील भोईटे कुटुंबीयांसह इतरांच्या घरी आज सकाळीच पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे.

Ratnagiri | अनेक भागांत अवकाळी पाऊस, आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा संकट

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल

Published On - 12:48 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI