Pimpri Chinchwad : तिघा बाईक चोरांच्या मुसक्या आवळल्या, 12.50 लाखाच्या 25 चोरीच्या बाईक जप्त, चाकण पोलिसांची कारवाई

| Updated on: Aug 17, 2022 | 9:03 AM

तिघा आरोपींकडून एकूण 12 लाख 50 हजारांच्या एकूण 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी नेमक्या कुणाच्या आहेत, आणि त्या या तिघांनी नेमक्या कशा चोरल्या, याचा तपास आता केला जातोय.

Pimpri Chinchwad : तिघा बाईक चोरांच्या मुसक्या आवळल्या, 12.50 लाखाच्या 25 चोरीच्या बाईक जप्त, चाकण पोलिसांची कारवाई
चोरीच्या 25 बाईकसर तिघे गजाआड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पिंपरी चिंचवड : दुचाकींची चोरी (Bike Theft in Chakan) करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी (Chakan Police) मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांच्या दुचाकी पोलिसांनी आरोपींकडून (Pimpri Chinchwad Crime News) जप्त केल्या आहेत. एकूण 25 चोरी केलेल्या दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून एकूण तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यामुळे आता इतर चोरही धास्तावलेत. चाकण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चाकण पोलिसांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत चाण पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे.

बाईक चोरांची धास्ती

अशोक सोनावणे, फारुख अन्सार, योगेश वंबाटे अशी अटक करण्यात आलेल्या तिघा चोरांची नावं आहेत. त्यांची चाकण पोलीस आता कसून चौकशी केली जात आहेत. रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चाकण पोलीस स्थानकाच्या हद्दीत बाईक चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अनेकांनी बाईक चोरीप्रकरणी तक्रार नोंदवली होती. यामुळे परिसरात बाईक चोरांची दहशत पसरली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अखेर दुचाकी चोरांची धरपकड केलीय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

तिघांचीच टोळी की आणखीही साथीदार?

तिघा आरोपींकडून एकूण 12 लाख 50 हजारांच्या एकूण 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी नेमक्या कुणाच्या आहेत, आणि त्या या तिघांनी नेमक्या कशा चोरल्या, याचा तपास आता केला जातोय. दुचाकी चोरांच्या या टोळीत त्यांचे अजूनही काही साथीदार आहेत का, या अनुशंगानेही पोलिसांकडून तपास केला जातोय. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी केलेल्या या कारवाईन बाईकचोरांचं धाबं दणाणलंय.