Video : भगत की कोठी ट्रेनची मालगाडीला मागून धडक! पहाटे 4 वाजता अपघात, एक डबा रुळावरुन घसरला

Gondia Train Accident : थोडक्यात मोठा अनर्थ यावेळी टळलाय. सध्या किरकोळ जखमी प्रवाश्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे 4 ची घटना घडली.

शाहिद पठाण

| Edited By: सिद्धेश सावंत

Aug 17, 2022 | 8:38 AM

गोंदिया : रायपूरकडून नागपूरच्या (Raipur to Nagpur) दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया (Gondia Train Accident) शहरालगत अपघात झाला. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने (Bhagat Ki Kothi) दिली मागून धडक दिली. धडकेनंतर भगत की कोठी ट्रेनचा एक डब्बा रुळांवरुन खाली घसरली. अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाली. थोडक्यात मोठा अनर्थ यावेळी टळलाय. सध्या किरकोळ जखमी प्रवाश्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे 4 ची घटना घडली. या अपघातानंतर काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पहाटेच्या वेळीस हा अपघात झाल्यामुळे अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. फारसा उजेडही नसल्यामुळे बचावकार्य करण्यासाठी काहीला विलंब झाला. मात्र रेल्वे प्रशासनाने तातडीनं या अपघाताची गंभीर दखल घेतली आणि जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर रेल्वे रुळांवरुन घसरलेला एक डबाही दुरुस्त करत या मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र 50 हून अधिक प्रवाशांना ट्रेनच्या धडकेची धास्ती बसलीय. या अपघातमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें