
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे सुरु आहेत. सोनमची जवळची मैत्रीण शिवानी आणि राज कुशवाहचा सहकारी राहुलने एका वुत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवानीनुसार सोनम प्रेम प्रकरणात पडेल अशी मुलगी नव्हती. तिचं सर्व लक्ष वडिल आणि भाऊ यांच्या प्लायवूड व्यवसायावर होतं. सोनम तिच्या पर्सनल लाइफबद्दल सर्वकाही मला सांगायची असा शिवानीचा दावा आहे. राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध असल्याच तिने कधी सांगितलं नाही असं तिची मैत्री शिवानी म्हणाली. अभ्यासात सोनम सरारी होती. पण बिझनेस माइंडेड होती. कुटुंबाचा व्यापार पुढे वाढवण्यात तिला रस होता असं शिवानीने सांगितलं.
राज कुशवाहचा सहकारी राहुलने राज आणि सोनममध्ये अफेअरचा मुद्दा फेटाळून लावला. ‘राज सोनमला दीदी बोलायचा. मग अफेअर कसं असू शकतं?’ असं राहुल म्हणाला. “राज खूप मेहनती होता. प्रोडक्शन थांबू नये म्हणून उशिरापर्यंत फॅक्टरीमध्ये थांबून काम करायचा” असं राहुलने सांगितलं. राहुलने दिलेल्या माहितीनुसार, “सोनमच कुटुंब राजाला मुलासारख मानायचं. अलीकडेच त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च ते उचलत होते” राज असं का करेल? सीबीआय चौकशीतून गोष्टी समोर येतील असं राहुल म्हणाला.
सोनमच्या आईला तिचं अफेअर माहित होतं का?
सोनमची मैत्रीण आणि राजच्या सहकाऱ्याच्या या वक्तव्यांनी पोलीस तपासाला नवीन दिशा दिली आहे. राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने गंभीर आरोप केलेत. त्याचवेळी सोनम आणि राजच्या जवळच्या सहकाऱ्यांची स्टेटमेंट अजून गोंधळात टाकत आहेत. “हे लग्न झालं, तर परिणाम चांगले होणार नाहीत असा सोनमने लग्नआधीच आपल्या आईला इशारा दिला होता” असा दावा राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने केला. विपिनच्या म्हणण्यानुसार, सोनमच्या आईला तिच्या अफेअरची पूर्ण कल्पना होती. पण तिने हे सत्य लपवून ठेवलं. सोनमच्या आईची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी विपिनची मागणी आहे.
सोनमने मोबाइल तोडून टाकलेला
राजाची हत्या 23 मे रोजी करण्यात आली. त्याच संध्याकाळी सोनम शिलॉन्ग वरुन गुवहाटीला आली. तिथून ट्रेन पकडून वारणसी मार्गे गाजीपूरला गेली. या दरम्यान तिने आपला मोबाइल फोन पोलिसांना मिळू नये म्हणून तोडून टाकला. तपासादरम्यान सोनमच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. त्यात ती आरोपींशी बोलताना दिसतेय.