नाशिक अपघातातील तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ जणांची ओळख पटली

| Updated on: Oct 09, 2022 | 2:58 PM

नाशिक शहरातील औरंगाबादरोड येथील मिर्ची हॉटेल चौफुली येथे पहाटेच्या वेळी ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात 12 प्रवाशांचा मृत्यू तर 43 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

नाशिक अपघातातील तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ जणांची ओळख पटली
Image Credit source: TV9 Network
Follow us on

Nashik Accident : नाशिक शहरात (Nashik City) शनिवारी झालेल्या अपघातात 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू (Death) झाला होता. त्यामुळे मृतांची ओळख ( Dead Body Identify) पटवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची प्रक्रिया मोठी अडचणीची होती. त्याचे कारण म्हणजे मृत व्यक्तींचे शरीर पूर्णतः जळून खाक झाले होते. डीएनए चाचणी (DNA test) करूनच मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी आठ मृतांची ओळख पटली असून तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिकच्या अपघातातील अजूनही पाच मृतांची ओळख पटली नसून डीएनए चाचणीसह फॉरेन्सिक लॅबचा अहवालाची प्रतिक्षा प्रशासनाला करावी लागत आहे. त्यात पाच मृत घेण्यासाठी नातेवाईक आले नसून प्रशासन त्यांच्याशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रियेत आहे.

बुलडाणा येथील कल्याणी मुधोळकर, पार्वती मुधोळकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शंकर कुचनकर यांची ओळख पटली आहे.

याशिवाय वाशीम येथील उद्धव भिलंग, वैभव भिलंग, साहिल चंद्रशेखर, अशोक बनसोड, ब्राम्हदत्त मनवर हे पाच जणांची ओळख पटली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक शहरातील औरंगाबादरोड येथील मिर्ची हॉटेल चौफुली येथे पहाटेच्या वेळी ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात 12 प्रवाशांचा मृत्यू तर 43 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही चालकांचा यामध्ये समावेश असून एकाला अटक तर एकाचा मृत्यू झाला आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार मृतांची ओळख पटविणे, त्यात डीएनए चाचणी करणे आणि त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची प्रक्रिया प्रशासकीय अधिकारी करीत आहे.