Cyber News : व्यवसायात जाहिरात करण्याच्या नादात महिलेला पाच लाखांना ‘ऑनलाईन’ गंडा

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Sep 28, 2022 | 6:25 PM

नाशिकच्या जून सिडको परीसरात राहणाऱ्या सविता अविनाश पवार यांनी सायबर पोलीस ठाण्यात पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

Cyber News :  व्यवसायात जाहिरात करण्याच्या नादात महिलेला पाच लाखांना 'ऑनलाईन' गंडा
Image Credit source: TV9 Network

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना वाढत चालल्या आहेत. त्यातच ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे महिलांना लक्ष करीत असतात. त्यामुळे महिलांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अनेकदा सायबर पोलीस (cyber Police) ठाण्यात दाखल होतांना दिसून येत आहे. अनेक महिला तर बदनामी आणि भीतीपोटी पोलीस ठाण्यात जाण्याचे टाळतात. मात्र, नाशिकमध्ये एका महिलेने दिलेली तक्रार पोलिसांच्याही भुवया उंचवणारी आहे. एक दोन नव्हे तब्बल पाच लाखांची टप्प्याटप्प्याने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारी वरुण सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खात्री केल्याशिवाय आणि सोशल मीडियावर (Social Media) करण्यात येणाऱ्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन नाशिकच्या सायबर पोलीसांनी केले आहे.

नाशिकच्या जून सिडको परीसरात राहणाऱ्या सविता अविनाश पवार यांनी सायबर पोलीस ठाण्यात पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

पवार यांचा घरगुती हर्बल प्रॉडक्ट बनविण्याचा व्यवसाय असून त्याची सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहिरात करणेसाठी पवार यांनी फेसबूकवर माहिती आणि संपर्क क्रमांक पोस्ट केला होता.

फेसबूकवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर मार्च 2022 मध्ये व्यापारवृद्धीसाठी आणि ऑनलाईन विक्रीसाठी पवार यांच्याशी इंफो इंडिया प्रा. लि. मधून बोलत असल्याचे सांगून आमिष दाखवले होते.

त्यात पवार यांचा विश्वास संपादन करत संबंधित व्यक्तींनी ऑनलाईन रक्कम टाकण्यास प्रवृत्त केले आणि रक्कम मिळवली आहे. त्यानंतर वेबसाइट सुरू करायची असल्याचे सांगून आणखी पैसे उकळवले आहे.

सविता पवार यांना विविध व्यक्तींनी संपर्क करून प्रोडक्ट विक्रीसाठीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

यानंतर पैसे देऊनही जाहिरात न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बिजली हे तपास करत असून ऑनलाईन व्यवहार शक्यतो टाळून सीडीएम किंवा एनईएफटी किंवा आयएमपीएसने व्यवहार करावा असे आवाहन केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI