AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मी अनेकवेळा तडजोड केली, पण…फडणवीसांनी सांगितला आयुष्याचा नियम; आमीर खानच्या प्रश्नाला दिलं खास उत्तर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमीर खानने मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी आदर्शवादी विचारांवरही भाष्य केलं. मी अनेकदा तडजोड केली पण ही तडजोड वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हती, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मी अनेकवेळा तडजोड केली, पण...फडणवीसांनी सांगितला आयुष्याचा नियम; आमीर खानच्या प्रश्नाला दिलं खास उत्तर!
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2026 | 8:59 PM
Share

Devendra Fadnavis : दिग्गज अभिनेता आमीर खान याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी आमीर खानने फडणवीस यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. राज्याचा विकास, शेती, पाणी, राजकारण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमीरने फडणवीस यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आमीर खानने विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं फडणवीस यांनी दिलखुलासपणे दिली. त्या मुलाखतीत आमीर खानने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी कधीही स्वार्थासाठी विचारांशी तडजोड केली नाही, असे फडणवीस म्हणाले. दैनिक लोकमततर्फे ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती.

तुमच्यातील आदर्शवाद एकदा मेला की…

या मुलाखतीत, तारुण्यात आपल्यात वेगवेगळे आदर्शवाद असतात. बदल घडवून आणण्याचे आपण स्वप्न बघतो. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहिले 35 वर्षांपेक्षा जास्त काळापासून तुम्ही राजकाणात आहात. तुमच्या आयुष्यात तुमचे आदर्शवाद किती प्रत्यक्षात उतरले? असा सवाल आमीर खानने फडणवीस यांना केला. त्यावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, आयडीयलीझमबद्दल बोलायचे झाले तर जीवनाच्या प्रवासात तुम्हाला वेळेनुसार बदलावे लागते. वेळेनुसार तुम्हाला आयडीयलीझचे सत्य समजत जाते. काळानुसार परिस्थिती बदलते. त्यानुसार निर्णयही घ्यावे लागतात, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच तुमच्यातला आदर्शवाद मात्र कधीच मरू दिला नाही पाहिजे. कारण तुमच्यातील आदर्शवाद मेला की तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये काहीच शिल्लक रहात नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मी अनेकवेळा तडजोड केली पण…

मी माझ्या आयुष्यात स्वत:चे काही नियम तयार केलेले आहेत. त्याच नियमानुसार मी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी प्रत्यक्षात प्रॅक्टिकलहीदेखील जगतो. कारण लोकशाहीत, राजकारणात तुम्ही निवडून येत असाल तर तुम्हाला हवा असलेला आदर्शवाद, बदल प्रत्यक्षात आणू शकता. मी अनेक लोक पाहिले ज्यांनी वेळेची हाक ऐकली नाही. वेळेनु सार ते स्वत:मध्ये बदल करू शकले नाहीत. त्यामुळेच ते संपून गेले, असे फडणवीस म्हणाले. तसेच मी इतिहासात मागे वळून पाहिले तर मला समजून येतं की मी ज्या विचारांना घेऊन आलो होतो, त्या विचारांना घेऊन 100 टक्के जगू शकलो नाही. मला कधी कधी तडजोड करावी लागली. माझ्या आयुष्यात मी अनेकवेळा तडजोड केली. परंतु मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी, स्वार्थासाठी मी कधीच माझ्या विचारांशी तडजोड केली नाही. मी भविष्यातही ही तडजोड करणार नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

आमीर खानचे केले कौतुक

मुलाखतीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता आमीर खान याचे कौतुक केले. तुम्ही पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप काम केले आहे. तुमच्या कामामुळे एक आदर्श निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागात तुम्ही जागृत केलेले आहे. तुम्ही त्यांना बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष