अडीच कोटीच्या हिरा चोरीत मोठा ट्विस्ट, आरोपी मुंबईतून बिहारमध्ये पळाले; आधाराकार्डने..

| Updated on: Feb 20, 2024 | 5:40 PM

मुंबईमध्ये एक जबर चोरीची घटना घडलीये. या प्रकारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. नुकताच पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केल्याचे बघायला मिळतंय. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. नुकताच आरोपींना अटक करण्यात आलीये.

अडीच कोटीच्या हिरा चोरीत मोठा ट्विस्ट, आरोपी मुंबईतून बिहारमध्ये पळाले; आधाराकार्डने..
Follow us on

मुंबई : नुकताच एक हैराण करणारी आणि धक्कादायक घटना घडलीये. मुंबईमधील या प्रकारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर या प्रकारानंतर थेट पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे देखील बघायला मिळतंय. घरातील नोकरांनी थेट अडीच कोटीच्या हिऱ्याची चोरी केली. हेच नाही तर चक्क घरातील सदस्यांच्या खाण्यामध्ये गुंगीचे आैषध मिळून यांनी ही जबरी चोरी केली. पोलिसांनी नुकताच या आरोपांनी अटक देखील केलीये. बिहारमधून या आरोपींना पोलिसांनी अटक केलीये.

या घटनेच्या तब्बल एक आठवड्यानंतर पोलिसांनी आरोपांनी ताब्यात घेतलंय. यामधील एक नोकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे थेट पुढे आले. यापूर्वीही 50 लाखांच्या चोरीचा आरोप त्या आरोपीवर आहे. आधारकार्डमुळे चोरांना पकडणे शक्य झाले. आधारकार्डच्या मदतीनेच पोलिसांनी या दोन चोरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून हैराण करणारे खुलासे हे करण्यात आले.

या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी बिहार पोलिसांची मदत देखील घेतलीये. निरज उर्फ राजा यादव (वय 19) आणि राजू उर्फ शत्रुघ्न कुमार (वय 19) अशी आरोपींची नावे आहेत. हे संबंधित मालकाकडे काही दिवसांपासून काम करत होते. निरज उर्फ राजा यादव आणि राजू उर्फ शत्रुघ्न कुमार यांनी मालकाच्या घरातील अनेक दागिन्यांची चोरी केली.

या आरोपींनी मुंबईत चोरी करत थेट बिहार गाठले. शेवटी मुंबई पोलिसांनी या आरोपांना बिहार पोलिसांच्या मदतीने थेट बिहारमधून अटक केली. नुकताच पोलिसांनी या आरोपींकडून अडीच कोटीचा हिरा देखील जप्त केलाय. हिऱ्यासोबतच आरोपींनी अजूनही माैल्यवान दागिन्यांची चोरी केल्याची देखील माहिती मिळत आहे.

ही सर्व घटना मुंबईतील खार परिसरातील आहे. 11 फेब्रुवारीला हा हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. 55 वर्षांच्या व्यक्तीने याबद्दलची तक्रार दाखल केली. गुंगीच्या आैषधामुळे घरातील सर्वच सदस्यांना उलटीचा त्रास जाणवत असल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपींकडून अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.