दारुच्या नशेत तरूणीला धावत्या ट्रेनमधून फेकले; दादर रेल्वे स्टेशनमधील धक्कादायक घटना
मुंबईच्या रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेस्थानकात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेस्थानकात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून एका तरुणीला खाली फेकले. दारूच्या नशेत एका व्यक्तीने या तरुणीला ट्रेनमधून धक्का दिला आणि ती खाली पडली. सुदैवाने तरूणी थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Published on: Aug 08, 2023 08:42 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
