प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले मोठे भाकीत, म्हणाले दिल्लीत मोठा आयटम…
येणाऱ्या काळात फक्त विकासाच्या गप्पा गोष्टी चालतील मात्र विकास अजिबात होणार नाही. जी 20 मला कळत नाही ते लोकांना काय कळणार? मन की बात मध्ये जी 20 काय आहे हे सांगा.
अक्कलकोट । 7 ऑगस्ट 2023 : धर्म आणि जात याचे राजकारण जेव्हा सुरु होईल तेव्हा माणुसकी संपलेली असेल. माणुसकी संपली की ओलावा आणि जिव्हाळा बळी पडतात. जे राजे होते त्यांचे राज्य टिकले नाहीत कारण समाजातील भिन्नता हे त्याचे कारण होते असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सत्तर वर्षात दंगली झाल्या मात्र त्यातून मनं दुभंगलेली नसायची. पूर्वी दंगल झाल्या की आठवडाभरानंतर सगळे सुरळीत व्हायचे. मात्र, काही हिंदुत्ववादी संघटना या ही मनं दुभंगण्याची काम करतात. महिनाभर थांबा या देशाच्या पंतप्रधानाचे खरे चित्र मांडायला मी सुरुवात करेन. येणाऱ्या काळात फक्त विकासाच्या गप्पा गोष्टी चालतील मात्र विकास अजिबात होणार नाही. जी 20 मला कळत नाही ते लोकांना काय कळणार? मन की बात मध्ये जी 20 काय आहे हे सांगा. येत्या काळात दिल्लीत मोठा आयटम होणार आहे. मोदी हे जगाचे, विश्वाचे नेते आहेत असे भासवले जाणार आहे. मोदीच्या फोटोत दुसरा कोणी मंत्री असतो का? एवढा फोबिया झालाय अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Published on: Aug 07, 2023 10:07 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
