मुस्लिम तांत्रिकाने अर्ध्या रात्री 17 वर्षाच्या मुलीला बोलावलं, त्यानंतर जे घडलं, त्याने उडाली एकच खळबळ

मुस्लिम तांत्रिकाने अर्ध्या रात्री एका 17 वर्षाच्या मुलीला बोलावलं, त्यानंतर जे घडलं, त्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. हा तांत्रिक सहा मुलांचा बाप आहे. यात गंभीर बाब म्हणजे मुलगी घरातून निघताना लाखो रुपये कॅश आणि दागिने घेऊन निघाली.

मुस्लिम तांत्रिकाने अर्ध्या रात्री 17 वर्षाच्या मुलीला बोलावलं, त्यानंतर जे घडलं, त्याने उडाली एकच खळबळ
Tantrik-Mantrik
Image Credit source: Representative Image
| Updated on: Jan 14, 2025 | 11:27 AM

एक मुस्लिम तांत्रिक 17 वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झाला आहे. तो सहा मुलांचा पिता आहे. गावात या बद्दल समजताच एकच संतापाची लाट उसळली आहे. पोलीस आरोपी तांत्रिकाचा शोध घेत आहेत. या तांत्रिकावर आधीपासून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं. शनिवार भाजपा नेते प्रताप सिंह काही गावकऱ्यांना घेऊन एसपी कार्यालयात आले. त्यांनी 45 वर्षीय तांत्रिकाविरोधात 17 वर्षीच्या मुलीच अपहरण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली. 24 तासांच्या आत मुलीचा शोध लागला पाहिजे, असं भाजप नेत्याने पोलिसांना अल्टीमेटम दिला आहे. पोलीस सध्या हा तांत्रिक आणि मुलीचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील किठौर क्षेत्रातील हे प्रकरण आहे.

भाजप नेत्याने आरोप केलाय की, गुरुवारी रात्री गावात राहणारा दुसऱ्या समुदायाचा तांत्रिक 17 वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झाला. त्याने तंत्र-मंत्राच्या बहाण्याने मुलीला बोलावलं. यात गंभीर बाब म्हणजे मुलीने घरातून निघताना स्वत:सोबत लाखो रुपये कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली.

अन्यथा आर-पारच्या लढाईची घोषणा

ग्रामस्थांनी सांगितलं की, 45 वर्षीय तांत्रिक सहा मुलांचा बाप आहे. तो याआधी सुद्धा अनेक गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आला आहे. त्यांनी हे प्रकरण दोन पक्षांशी संबंधित असल्याच सांगितलं. किठौर पोलीस मुलीला शोधण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीयत असं सांगितलं. “पोलिसांनी 24 तासांच्या आत मुलीला शोधून काढलं नाही, तर भाजप गावात महापंचायत बोलवून आर-पारच्या लढाईची घोषणा करेल” असा इशारा भाजप नेते प्रताप सिंह यांनी दिला.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. ते तांत्रिकासोबत या कृत्यात सहभागी होते. पण तांत्रिकाला अजून अटक झालेली नाही. त्यांचा शोध सुरु आहे. लवकरच तांत्रिक आणि मुलीला शोधून काढू असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातली गंभीर बाब म्हणजे मुलगी घरातून निघताना लाखो रुपयांची कॅश आणि दागिने घेऊन निघाली. म्हणजे दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात.