बिग बॉसमधून बाहेर पडताच सोनाली केला मोठा खुलासा, म्हणाली आतमध्ये गेल्यानंतर ‘मला पहिल्याच आठवड्यात…’

बिग बॉस मराठी सीझन 6 मधून सोनाली राऊत घराबाहेर पडली आहे. अशातच तिने बिग बॉसच्या घरातील काही गोष्टींवर मोठं भाष्य केलं आहे. काय म्हणाली सोनाली?

बिग बॉसमधून बाहेर पडताच सोनाली केला मोठा खुलासा, म्हणाली आतमध्ये गेल्यानंतर मला पहिल्याच आठवड्यात...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 02, 2026 | 6:55 PM

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी 6’ चा दुसरा एलिमिनेशन सोहळा रविवारी पार पडला असून या आठवड्यात अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊत हिला शोमधून बाहेर पडावे लागले. एलिमिनेशननंतर पहिल्यांदाच तिने दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील तिचा अनुभव सांगत तिला झालेल्या गंभीर आजारपणाचा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

सोनाली राऊतने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या माध्यमाला मुलाखत दिली असून तिने या मुलाखतीदरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यातील अनुभव सांगताना म्हटले, ‘पहिल्या आठवड्यात सगळ्यांना भेटल्यानंतर अनुभव खूप चांगला होता. काही स्पर्धकांना माझ्याबद्दल आधीच माहिती होती. त्यांना असं वाटत होतं की, जर कुठे भांडण झालं तर ते माझ्याशीच होईल. पहिला आठवडा पाहिला तर, भांडणं माझ्यामुळेच सुरू झाली आणि ग्रुप्सही आधीच ठरलेले होते.’

शोच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तिला इन्फेक्शनचा त्रास सुरू झाला. ती म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात राहणं खूप वेगळं असतं. गार्डन एरिया देखील पूर्णपणे ओपन नव्हता. घरात सगळे स्पर्धक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असतात. आपण सगळे एकत्र राहत असल्यामुळे कुठे ना कुठे हायजिनचा कॉम्प्रोमाईज होतो. त्यामुळे मला इन्फेक्शन झालं आणि त्याचा माझ्या गेमवरही मोठा परिणाम झाला.’

गेमपासून दूर राहण्यामागचं कारण

आजारी असल्यामुळे सोनाली दुसऱ्या आठवड्यात बर्‍याच प्रमाणात इतर स्पर्धकांपासून दूर राहिली होती. ती त्या काळात कुठल्याही अ‍ॅक्टिव्हिटीत सहभागी झाले नाही. मी सगळ्यांपासून लांब राहत होते कारण तब्येत साथ देत नव्हती असं तिने स्पष्ट सांगितले.

बिग बॉसच्या घरात तिची काळजी कोण घेत होती असा प्रश्न विचारल्यावर सोनालीने सांगितले की, ‘सगळ्यांनीच माझी काळजी घेतली. मी स्वतःही स्वतःची काळजी घेत होते. शेणाचा जो टास्क होता, तो मी मुद्दाम केला नाही, कारण मला माहीत होतं की त्याचा माझ्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल.’

‘मी वारंवार सांगत होते की मला कपडे बदलायचे आहेत पण मी कशा परिस्थितीतून जात होते हे कोणालाच नीट समजत नव्हतं. डॉक्टरही आले होते पण त्यांनाही नेमकं काय होत आहे ते सांगता येत नव्हतं. औषधं दिली गेली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर तिला घराच्या बाहेर येऊनच योग्य उपचार घ्यावे लागणार असल्याचं स्पष्ट झालं. मला बाहेर जाऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागणार होती. अजूनही माझं उपचार सुरू आहेत असा खुलासा तिने केला.