Education: महाराष्ट्र बोर्ड पहिली ते बारावी परीक्षांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय!

| Updated on: Jun 25, 2022 | 9:05 AM

गेल्या दोन वर्षात पहिली ते बारावीच्या परीक्षा या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आल्या. आता परिस्थिती पूर्ववत होत असताना शिक्षण विभागानं याच निर्णयात बदल केलाय.

Education: महाराष्ट्र बोर्ड पहिली ते बारावी परीक्षांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय!
BMC School students will be given free items
Follow us on

मुंबई: मागील दोन वर्ष संपूर्ण देश कोरोनाच्या (Corona) संकटात होता. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त हाल झाले ते शिक्षणाचे. शिक्षण ऑनलाइन. विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत होते. काहींपर्यंत या सुविधा पोहचल्या होत्या, काहींपर्यंत सुविधाच पोहचल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांकडे सगळं उपलब्ध असूनही ऑनलाइन समजून घ्यायला अडचणी येत होत्या. अशा अनेक अडचणींमधून कोरोना काळात आपली शिक्षण (Education) व्यवस्था गेली. अडचण समजून घेत शिक्षण विभागानं सुद्धा त्यांच्या परीनं शक्य तितके बदल केले आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला. त्यातला एक प्रयत्न म्हणजे गेल्या दोन वर्षात पहिली ते बारावीच्या परीक्षा या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आल्या. आता परिस्थिती पूर्ववत होत असताना शिक्षण विभागानं याच निर्णयात बदल केलाय. शैक्षणिक वर्ष 2022- 23 साठी पहिली ते बारावीच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर (100% Syllabus) आधारित होणार असल्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने काल, शुक्रवारी (24 जून) रोजी जारी केलीये.

…त्यामुळे ही कपात करण्यात आली

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती. राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद होत्या. अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू होते, मात्र अपुऱ्या इंटरनेट सुविधा आणि नेटवर्किंगच्या समस्येमुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले नाही. त्यामुळे ही कपात करण्यात आली. आता शैक्षणिक वर्ष 2022-23पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलीये.

हे सुद्धा वाचा

CBSE नववी ते बारावी परीक्षांचा पॅटर्न बदलला

2022-23 या सत्रापासून सीबीएसई नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आकलन आणि गुणवत्तेवर आधारित असणारे. त्याआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पुढील सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या 10 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. सत्र 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत 50 टक्के वैकल्पिक प्रश्न विचारण्यात आले होते, जे सत्र 2022-23 साठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पुढील सत्रापासून नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवर आधारित असतील. मात्र, अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 1 असे आहे

  • मेरिट बेस्ड प्रश्न – 30 टक्के
  • वैकल्पिक प्रश्न – 20 टक्के
  • लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्न – 50 टक्के

इयत्ता 9 वी व 11 वीच्या प्रश्नपत्रिकेचा प्रकार

  • गुणवत्तेवर आधारित प्रश्न – 40 टक्के
  • वैकल्पिक प्रश्न – 20 टक्के
  • लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्न – 40 टक्के