AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पाच्या आगमनासाठी एसटी महामंडळ सज्ज! खास गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

एसटी महामंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

बाप्पाच्या आगमनासाठी एसटी महामंडळ सज्ज! खास गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 25, 2022 | 7:39 AM
Share

मुंबई: 31 ऑगस्ट2022 रोजी श्री गणरायाचे (Ganpati Bappa) आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालंय. यंदा कोरोना (Corona) संकटानंतर प्रथमच चाकरमान्यांना गावी जाण्याची संधी मिळणारे. एसटी महामंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान या जादा गाड्या चालविण्यात येणार असून 25 जूनपासून त्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा- ॲड. अनिल परब

मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ॲड. परब यांनी केले आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती सणासाठी चाकरमानी वर्षभरापासून प्लॅनिंग करत असतात. त्यामुळे अडीचशे बसेस यंदा सोडण्यात येणार असून 25 जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

 कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार

25 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील, तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरदरम्यान परतीच्या गाड्या निघतील. या बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर मोबाईल येणार आहेत. ॲपद्वारे, खासगी बुकिंग एजंटकडे उपलब्ध होणार आहे, असेही ॲड. परब यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात

इथून सुटणार गाड्या

  • मुंबई सेंट्रल (मुंबई सेंट्रल साईबाबा)
  • काळाचौकी गिरगाव
  • कफ परेड
  • केनेडी ब्रीज
  • काळबादेवी
  • महालक्ष्मी
  • परळ (परळ सेनापती बापट मार्ग, दादर)
  • मांगल्य हॉल (जोगेश्वरी)
  • कुर्ला नेहरूनगर
  • बर्वे नगर
  • सर्वोदय हॉस्पिटल (घाटकोपर)
  • टागोरनगर (विक्रोली)
  • घाटला (चेंबूर)
  • डी. एन. नगर (अंधेरी)
  • गुंदवली अंधेरी
  • सांताक्रुझ (आनंदनगर)
  • विलेपार्ले
  • खेरनगर (वांद्रे)
  • शीव
  • पनवेल आगार
  • उरण आगार
  • ठाणे 1
  • भाईंदर
  • लोकमान्य नगर
  • श्रीनगर
  • विटावा
  • नॅन्सी कॉलनी (बोरिवली)
  • मालाड
  • डहाणूकरवाडी
  • चारकोप (कांदिवली)
  • महंत चौक (जोगेश्वरी)
  • संकल्प सिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव)
  • ठाणे-२ भांडुप (पूर्व आणि पश्चिम)
  • मुलुंड (पू.) विठ्ठलवाडी, बदलापूर
  • अंबरनाथ
  • कल्याण-डोंबिवली (पश्चिम) व (पूर्व)
  • नालासोपारा
  • वसई आगार
  • अर्नाळा आगार ठिकाणांहून गाड्या सुटणार आहेत.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.