AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : ‘योग प्रचारात मोदींचं मोठे योगदान! गुवाहाटीमध्ये योग शिबीर’, सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

योग शिबिरात साामी झालेल्या किमात सात-आठ जणांवरचं ईडी-पीडी बालंट भाजपने चुटकीसरशी दूर केलं. त्यामुळे हे शिबिरार्थी महाशक्तीचे चरणदास झालेत. मोदी आपले आदरणी पंतप्रधान आहेत. योग प्रचारात त्यांचं मोठंच योगदान आहे.

Saamana : 'योग प्रचारात मोदींचं मोठे योगदान! गुवाहाटीमध्ये योग शिबीर', सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
'योग प्रचारात मोदींचं मोठे योगदान! Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 25, 2022 | 7:34 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर गुवाहाटीमध्ये आजचा बंडखोर शिवसेना (Shivsena) आमदारांचा चौथा दिवस आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आमदारांचा वाढतं समर्थन शिवसेनेची चिंता वाढवतोय. आता तर शिवसेनेनं या सगळ्यामागे ‘भाजपच  (BJP) आहे’ असा थेट आरोप केला आहे. गुवाहाटीमधील योग शिबीर असं, म्हणत सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. भाजपच्या राजकारणासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत निशाणा साधण्यात आला आहे. जागतिक योगदिनी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यावरुन तिखट शब्दांत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

गुवाहाटीमधील योग शिबीर, या शिर्षकाखाली अग्रलेखात असं म्हटलंय, की…..

गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारुन बसवलेत, त्यांचा संबंध योगाची नसून भोगाशी आहे. भोग्यांना हाताशी धरुन भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतोय. महाशक्तीच्या मदतीने गुवाहाटीमधील बाबा योगराज हे ठाकरे सरकार घालवण्यासाठी ध्यानसाधना करतायत. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसं फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा, या प्रवृत्तीविरोधात देश एकवटतोय. योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू-गांजा मिसळून दिला जात असावा आणि त्याच गुंगीत, धुंदीत ते बोलत आणि डोलत आहेत, असं दिसतं.

ईडीची भीती?

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने शिवसेना आमदार फोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात पुढे असंही म्हटलंय, की…योग शिबिरात साामी झालेल्या किमात सात-आठ जणांवरचं ईडी-पीडी बालंट भाजपने चुटकीसरशी दूर केलं. त्यामुळे हे शिबिरार्थी महाशक्तीचे चरणदास झालेत. मोदी आपले आदरणी पंतप्रधान आहेत. योग प्रचारात त्यांचं मोठंच योगदान आहे. ते ध्यान, चिंतन करतात, पण गुवाहाटीचं ध्यान आणि चिंतन वेगळंय.

गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारुन बसवलेत, त्यांचा संबंध योगाशी नसून, भोगाशी आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट