EDUCATION NEWS : अकरावी प्रवेशाची नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्ज भरण्याची प्रक्रिया

| Updated on: Jun 02, 2022 | 7:32 AM

SSC STUDENT : अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी करीत आहेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांनी घाबरून जायचं काहीचं कारण नाही.

EDUCATION NEWS : अकरावी प्रवेशाची नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्ज भरण्याची प्रक्रिया
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – दोन वर्षे कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्रात जो गोंधळ होता. तो अद्याप पुर्णपणे संपलेला नाही. दहावीच्या सीबीएसई (CBSC) आणि आरसीएसईची (RCSE) परीक्षा 23 मे आणि 24 मे रोजी संपली. जोपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर होत नाहीत. तोपर्यंत अकरावीचा ऑनलाईन प्रवेश करू नका अशी मागणी सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांची मागणी आहे. विशेष म्हणजे 30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी सुरू झाली असून बोर्डाचे विद्यार्थी अर्जाचा भाग एक भरत आहेत. एसएससी विद्यार्थ्यांना (SSC Student) फक्त अर्ज भरता येत आहेत. तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही. त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना अर्ज भरता येईल.

निकालानंतर नोंदणी सुरू राहणार

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी करीत आहेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांनी घाबरून जायचं काहीचं कारण नाही.

असा करा अर्ज

  1. लॉगिन वर क्लिक करा.
  2. लॉगिन व पासवर्ड टाका.
  3. हे सुद्धा वाचा
  4. डाव्या बाजूस समोर आलेली सर्व माहिती टॅबमध्ये भरा.
  5. तुमचा संबंधित प्रवर्ग निवडा.
  6. आरक्षणानुसार माहिती भरा.
  7. कोटा पसंती, तुमचा अल्पसंख्याक प्रकार भरा.
  8. विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  9. वेबसाईटवर उपलब्ध असलेला हमीपत्राचा नमुना भरून अपलोड करा.
  10. दिलेलं शुल्क भरा.
  11. त्यानंतर लॉक अॅप्लीकेशन फॉर्मवर क्लिक करा.

अशी करा नोंदणी…

  1. http://11theadmission.org.in
  2. वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक करा
  3. जिथं शिक्षण घ्यायचं आहे ते क्षेत्र निवडा (उदा. मुंबई, नागपूर, अमरावती)
  4. विद्यार्थी नोंदणीवरती क्लिक करा.
  5. शाळेच्या ठिकाणानुसार पर्याय निवडा
  6. अॅप्लीकेशन स्टेटसवर जा, तिथला योग्य पर्याय निवडा
  7. दहावीचे बोर्ड निवडा
  8. तुमचा योग्य बैठक क्रमांक टाका
  9. मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून कॅप्चा टाका
  10. नोंदणीवर क्लिक करा.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी अनेक विद्यार्थींनी केली

30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी अनेक विद्यार्थींनी केली असून अद्याप अधिकृत कोणतीही आकडेवारी शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही.

प्रवेश प्रक्रिया खूप दिवस चालणार असून सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांना देखील नोंदणी करता येणार आहे