अकरावी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहात? विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा

| Updated on: Dec 20, 2020 | 7:51 AM

पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी 24 डिसेंबरला जाहीर होईल, तर दुसरी विशेष फेरी 27 डिसेंबरपासून असेल

अकरावी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहात? विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा
Students
Follow us on

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी रिक्त जागांची माहिती आज (रविवार 20 डिसेंबर 2020) जाहीर होणार आहे, तर पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी येत्या गुरुवारी (24 डिसेंबर 2020) प्रसिद्ध होणार आहे. अंदाजे सत्तर हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहे. तीन फेऱ्यांमधील प्रवेशानंतर आता विशेष फेरीकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Eleventh standard admission entrance special list details)

तीन नियमित फेऱ्यांनंतर आता अकरावीच्या विशेष प्रवेश फेऱ्या सुरु होणार आहेत. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी 24 डिसेंबरला जाहीर होणार आहे, तर दुसरी विशेष फेरी 27 डिसेंबरपासून सुरु होईल.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एक लाख 16 हजार 119 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी यावेळी स्पर्धा पाहायला मिळाली. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या 63 हजार 359 जागा होत्या, तर 74 हजार 536 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. म्हणजेच उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. 28 हजार 839 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विशेष फेरीसाठी कोट्यातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

अकरावी प्रवेश विशेष फेरीविषयी महत्त्वाच्या तारखा

20 डिसेंबर, सकाळी 10 वाजता : रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार (महाविद्यालयांनी प्रत्यर्पित केलेल्या सर्व कोट्यातील जागांसह एकूण रिक्त जागा)

प्रवेश अर्जात आवश्यक ते बदल आणि पसंतीक्रम नोंदवणे : 20 डिसेंबर, सकाळी 10 वाजल्यापासून 22 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

24 डिसेंबर, सकाळी 11 वाजता : प्रवेश यादीची घोषणा

24 डिसेंबर, सकाळी 11 वाजल्यापासून 26 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत : मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे

27 डिसेंबर : विशेष फेरीनंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार

(Eleventh standard admission entrance special list details)

तिसऱ्या गुणवत्ता यादीत काय झालं?

मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून 1 लाख 19 हजार 171 जागा उपलब्ध होत्या. त्यातील 1 लाख 16 हजार 80 जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 6 हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 8 हजार 86 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, 6 हजार 837 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 57 तर पाचव्या पसंतीचे महाविद्यलय मिळालेल्याची संख्या 5 हजार 173 इतकी आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या 45 हजार 402 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 366 विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या 1289 तर सीबीएसईच्या1136 विद्यार्थ्यांचा तिसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश आहे.

तिसरी फेरी

कला – एकूण शिल्लक जागा 14,557 – कॉलेज मिळालेले विद्यार्थी 3908
वाणिज्य- एकूण शिल्लक जागा – 63,359 कॉलेज मिळालेले विद्यार्थी- 28,839
विज्ञान- एकूण शिल्लक जागा 38,869 – कॉलेज मिळालेले विद्यार्थी -12,553

एकूण शिल्लक जागा- 1,19,171 तिसऱ्या फेरीत कॉलेज मिळलले विद्यार्थी -45,402

संबंधित बातम्या 

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

(Eleventh standard admission entrance special list details)