अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. (11th admission third merit list announced)

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये मुंबई विभागातून 45 हजार 402 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. (11th admission third merit list announced)

मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून 1 लाख 19 हजार 171 जागा उपलब्ध होत्या. त्यातील 1 लाख 16 हजार 80 जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यी 18 डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करु शकणार आहेत.

अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 6 हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 8 हजार 86 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, 6 हजार 837 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 57 तर पाचव्या पसंतीचे महाविद्यलय मिळालेल्याची संख्या 5 हजार 173 इतकी आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या 45 हजार 402 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 366 विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या 1289 तर सीबीएसईच्या1136 विद्यार्थ्यांचा तिसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश आहे.

तिसरी फेरी

कला – एकूण शिल्लक जागा 14,557 – कॉलेज मिळालेले विद्यार्थी 3908
वाणिज्य- एकूण शिल्लक जागा – 63,359 कॉलेज मिळालेले विद्यार्थी- 28,839
विज्ञान- एकूण शिल्लक जागा 38,869 – कॉलेज मिळालेले विद्यार्थी -12,553

एकूण शिल्लक जागा- 1,19,171 तिसऱ्या फेरीत कॉलेज मिळलले विद्यार्थी -45,402

(11th admission third merit list announced)

संबंधित बातम्या

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 26 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI