CBSE : पोरांनो परीक्षेचं ॲडमिट कार्ड डाऊनलोड केलंत का ? ‘या’ लिंकवर जा आणि ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा

| Updated on: Apr 15, 2022 | 6:11 PM

देशभरात वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोविड नियमांचं पालन करायचं आहे.

CBSE : पोरांनो परीक्षेचं ॲडमिट कार्ड डाऊनलोड केलंत का ? या लिंकवर जा आणि ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा
परीक्षेचं ॲडमिट कार्ड डाऊनलोड केलंत का ?
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली : 10वी आणि 12वी च्या CBSE सत्र 2 मधील परीक्षा 26 एप्रिलला (April) सुरु होऊन अनुक्रमे 24 मे आणि 15 जूनला संपणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE ) सत्र 2 चं ॲडमिट कार्ड त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) जारी केलंय. देशभरात वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोविड नियमांचं पालन करायचं आहे. ॲडमिट कार्ड अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त शाळा आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा उपलब्ध असतील.

कसं डाऊनलोड करणार ॲडमिट कार्ड ?

सगळ्यात आधी CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जा.

होम पेजवर दिलेल्या 10वी आणि 12वी च्या ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

तिथे विचारण्यात आलेली माहिती भरा आणि लॉग इन करा

ॲडमिट कार्ड समोर स्क्रीनवर दिसेल

चेक करून डाऊनलोड करा आणि त्या ॲडमिट कार्डची प्रिंट काढा

अधिकृत वेबसाईट

cbse.gov.in 

परीक्षेच्या तारखा

10वी सत्र 2  परीक्षा – 26 एप्रिल ते 24 मे

12वी सत्र 2  परीक्षा – 26 एप्रिल ते 15 जून

इतर बातम्या :

DC vs RCB IPL 2022 Head to Head: आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात कोणाचं पारडं जड?

Pravin Kalme : तुम्हाला जितेंद्र आव्हाड, मंत्री अनिल परब वाचवतायत का? सोमय्यांच्या टार्गेटवरचे प्रवीण कलमे म्हणतात, आव्हाड-सोमय्या एकत्र येऊन…

मातोश्री वर हनुमान चालीसा वाचायला गेले तर शिवसैनिक तुमचाच हनुमान करतील; शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांचा रवी राणा यांना इशारा