Pravin Kalme : तुम्हाला जितेंद्र आव्हाड, मंत्री अनिल परब वाचवतायत का? सोमय्यांच्या टार्गेटवरचे प्रवीण कलमे म्हणतात, आव्हाड-सोमय्या एकत्र येऊन…

Pravin Kalme : एसआरएच्या कार्यालयातील कागदपत्रे चोरून नेणारे प्रवीण कलमे पोलिसांना सापडत नाहीयेत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

Pravin Kalme : तुम्हाला जितेंद्र आव्हाड, मंत्री अनिल परब वाचवतायत का? सोमय्यांच्या टार्गेटवरचे प्रवीण कलमे म्हणतात, आव्हाड-सोमय्या एकत्र येऊन...
सोमय्यांच्या टार्गेटवरचे प्रवीण कलमे म्हणतात, आव्हाड-सोमय्या एकत्र येऊन...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:56 PM

मुंबई: एसआरएच्या कार्यालयातील कागदपत्रे चोरून नेणारे प्रवीण कलमे (pravin kalme) पोलिसांना सापडत नाहीयेत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केली होती. त्यामुळ कलमे नक्की गेले कुठे असा सवाल केला जात असतानाच प्रवीण कलमे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. माझ्याविरोधात एफआयआर झालेला आहे, याची कल्पना मला कशी नाही मिळाली? जितेंद्र आव्हांडांना (jitendra awhad) यावर मी अनेक पत्र लिहिलेली आहेत. त्यावरही अजून कारवाई झालेली नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांना एफआयआर झाल्याचं कळलं कुठून? ते मुंबई पोलीस आहेत का? माझी तक्रार इकॉनोमिक ऑफेन्सकडे गेल्यानंतर माझ्याविरोधात तक्रार होते. हे म्हणजे एक ट्रॅप आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप प्रवीण कलमे यांनी केला आहे. प्रवीण कलमे हे माध्यमांशी बोलत होते.

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आनंद पंडीत, लोसट ग्रूप यांनी 19 इमारतींमध्ये बेकायदेशीर बांधकामं केली. आर्थिक घोटाळे केले. याची आम्ही तक्रार केली होती. सीईओ, एसआरए, म्हाडा आणि संबंधित यंत्रणांना आम्ही कळवलं होतं. निवृत्त आयएएस ऑफिसर मुलाच्या रिसेप्शनमध्ये हे सगळे भेटले आणि त्यानंतर हा सगळा प्लान शिजला असावा, असा दावा प्रवीण कलमे यांनी केला. ते एबीपी न्यूज नेटवर्कशी संवाद साधत होते. आपल्याला अनिल परब, जितेंद्र आव्हाड वाचवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून तक्रार झाली असेल

ज्या इमारतीचं इन्स्पेक्शन होतं ती इमारत टायटल क्लिअर नसताना बांधली गेली. एका आरजी ग्राऊंडवर बांधली गेली. त्या इमारतीचं बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी गृह निर्माण मंत्रालयाचा सचिन वाझे आहे असा अत्यंत गंभीर आणि निराधार आरोप माझ्यावर केला होता. त्याचं पत्र सीईओंकडे आलेलं असावं, त्यामुळेच हे पत्र आलेलं असावं किंवा तक्रार केलेली असेल, असा कयास त्यांनी व्यक्त केला.

मी लंडनमध्ये नाही, मिडल ईस्टमध्ये आहे

मी माझं काम संपलं की लगेच भारतात येणार आहे. मला आज कळलं की माझ्याविरोधात एफआयआर झालेला आहे. याबाबत मला अजिबात माहिती नव्हती. याबाबत कोणत्याही यंत्रणेचा ना मला फोन आलाय, ना ई-मेल केलाय. माझे वकील लंडनला आहेत. आम्ही कायदेशीर प्रक्रिया करतोय. मी लंडनमध्ये नाही. मी मिडल ईस्टमध्ये आहे. माझ्यावर एफआयआर झालेला आहे, हे कळलं असतं, तर तुम्ही म्हणू शकता की मी पळालो म्हणून. पण मला माहीतच नाही, की असा काही एफआयआर झालेला आहे ते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एफआयआर वाचलेला नाही

मी अजून एफआयर वाचलेला नाही. त्यामुळे त्याची माहिती नाही. 25 जून 2022ला मी एक आरटीआय फाईल केले होते. एका बिल्डिंगच्या चौकशीवेळी सोमय्या साहेब आलेले होते. नंतर आम्हाला कळलं की सोमय्यांच्या पत्रामुळे चौकशी रद्द झाली आहे. याबाबत आम्ही कोर्टातही दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टानं आमची याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. मी मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Praveen Kalme : प्रवीण कलमेंना 100 कोटींचं टार्गेट होतं, ते म्हाडातले ‘सचिन वाझे’, सोमय्यांच्या आरोपावर पहिल्यांदाच कलमेंची बाजू वाचा

Praveen Kalme : मला आजच कळतंय की माझ्याविरोधात FIR, मी आखाती देशात, सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे अवतरले

Aaditya Thackeray On Raj Thackeray: मशिदीवरचे भोंगे हटवण्यापेक्षा, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना थेट सल्ला

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.