अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया… आदिवासी भागातील मुलांचं होतंय जोरदार कौतुक, काय आहे कारण?

बाल वयात केले जाणारे प्रयोग विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतात. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या इगतपुरी येथील काही विद्यार्थ्यांनी नुकतीच एक काठी तयार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया... आदिवासी भागातील मुलांचं होतंय जोरदार कौतुक, काय आहे कारण?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Mar 27, 2023 | 9:57 AM

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांनी एक असा यशस्वी प्रयोग केलाय की ज्याचा फायदा अंध व्यक्तींना होणार आहे अंध व्यक्तींसाठी एक इलेक्ट्रॉनिक सेंसर असलेली काठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून समोरचा येणारा अडथळा हा अंध बांधवांच्या लक्षात येईल आणि ते लगेच मार्ग सुरक्षित बदलू शकतील. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील महात्मा गांधी हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंध बांधवांसाठी एक काठी बनवली आहे. अशी काठी की जी चालत असताना समोर काही अडथळा आला तर त्यांना लगेच कळेल आणि ते आपला मार्ग सुरक्षितपणे बदलतील.

खरंतर आपल्याला विश्वास बसणार नाही की शाळेतील मुलं असं काही करू शकतील परंतु हे खर आहे. विद्यार्थ्यांनी काठीची निर्मिती करायचं ठरवलं आणि काठी दिवसांत तयार केली आहे. त्याला ब्लाइंड स्टिक असं म्हंटलं जात आहे.

काठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रासोनिक सेंसर, बझर, मायक्रो कंट्रोलर, आरडीनो उनो बोर्ड, नऊ व्याा वॉल्टची बॅटरी आदी सामानांचा वापर करून ही अत्याधुनिक काठी बनवली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी या अत्याधुनिक काठीचा यशस्वी प्रयोग देखील आपल्याच शाळेत केला आहे.

आय ओ टी कोर्सच्या माध्यमातून या शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक वस्तू बनवण्याचे मार्गदर्शन केलं जातं. हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी नवनवीन वस्तू तयार करतात. त्यातीलच हा एक अंध बांधवांसाठी उपयोगी येईल असा एक यशस्वी प्रयोग केला आहे.

तर या कोर्सच्या माध्यमातून शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी यशस्वी अशी ब्लाइंड स्टिक तयार केली आहे. लवकरच या शाळेतील विद्यार्थी स्मार्ट डस्ट बिन, स्मार्ट कार आणि स्मार्ट संगणक बनवणार आहेत. त्या दिशेने विद्यार्थ्यांनी वस्तू बनविण्याचे कार्य सुरू केले आहे.

खरंतर आजच्या डिजिटल युगात अत्याधुनिक वस्तूंचा आणि यंत्रांचा अधिक वापर वाढला आहे. त्यातच विद्यार्थ्यांना शाळेत मिळणाऱ्या अशा मार्गदर्शनाद्वारे आणि अशा कोर्सच्या माध्यमातून भविष्यात नवनवीन टेक्नॉलॉजी अस्तित्वात आणून लोकउपयोगी पडू शकतात त्यामुळे अत्याधुनिक वस्तूंची अधिकच भर पडू शकणार आहे.

आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या इगरपुतीतील विद्यार्थ्यांनी ही काठी तयार केली असून अंध व्यक्तींना मोठी मदत होणार आहे. हृदय बागल, प्रितेश भागडे, निखिल चव्हाण, जगदीश राक्षे, अनिल चौधरी, सुनील चौधरी, हर्षद भागडे, रोहित गांगुर्डे, जय शिंदे, अंकुश मोरे, सार्थक मुळीक, जयेश भागडे आणि वैभव पाटील यांनी सहभाग घेतला होता.