D.Ed | गुरुजी व्हायचंच नाही की काय? औरंगाबादेत डीएड कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकेनात, जागा 2500 नि अर्ज आले 250!

| Updated on: Jul 02, 2022 | 11:29 AM

D.Ed. admission: कधीकाळी गुरुजी होण्याचे कोण सूख होते. मास्तर होण्याची एक लाट संपूर्ण राज्यात आली होती. पण नोक-यांचा फुगा फुटला नी ही लाट ओसरली. आता डीएड कॉलेजकडे विद्यार्थीही फिरकत नसल्याचे चित्र आहे.

D.Ed | गुरुजी व्हायचंच नाही की काय? औरंगाबादेत डीएड कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकेनात, जागा 2500 नि अर्ज आले 250!
डीएड कॉलेजकडे विद्यार्थ्यांची पाठ
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

राज्यात भरमसाठ पीक आलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना(D.Ed. Colleges) आता विद्यार्थ्यांसाठी (Students)वणवण फिरावे लागत आहे. या महाविद्यालयांतील घटत्या विद्यार्थी संख्येमुळे संचालक हवालदिल झाले आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमासाठी येणारा पूर थोपवण्याचे आणि मॅनेजमेंट कोट्यातून (Management Cota) कमाईचे मोठे कुरण झालेली ही व्यवस्था आता विद्यार्थ्यांची वाट पाहत आहे. मराठी शाळांकडे पालकांनी जशी पाठ फिरवली तशीच अवस्था डी.एड.कॉलेजची झाली आहे. समाजातील कोणालाच गुरुजी (Teacher)व्हायचं नाही का? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन विचारला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यांत डी. एड.महाविद्यालयात प्रवेशाच्या जवळपास 2500 जागा आहेत. तर प्रवेशासाठी (Admission) अवघे 250 अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा आता किती महाविद्यालयांना टाळे लागणार असा प्रश्न संचालकांसमोर उभा ठाकला आहे. झटपट नोकरी मिळण्याच्या या राजमार्गाकडे विद्यार्थ्यांनी फिरवलेली पाठ ही संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे.

नोक-या घटल्याचा परिणाम

समाजावर शिक्षण व्यवस्थेचे मोठी पकड असते. शिक्षक होणे हे आजही भारतीय समाजात प्रतिष्ठेचं आणि आदराचं मानल्या जाते. 2002 नंतर राज्यात शिक्षक भरतीची मोठी लाट आली होती. जो तो शिक्षक होण्यासाठी धावत होता. पार चंद्रपुरचा उमेदवार कोल्हापूरात तर पश्चिम महाराष्ट्रातील तरुण विदर्भातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेशासाठी धडपडत होता. परिणाम असा झाला की गल्लीबोळात डी.एड कॉलेज उभी राहिली. परंतू त्याप्रमाणात नोक-या काही मिळेनात. मग झटपट नोकरी देणा-या या अभ्यासक्रमाकडे समाजाने पाठ फिरवली.याविषयी शिक्षक अविनाश न-हेराव यांनी सांगितले की, आता बहुतांश पालकांना त्यांचा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, अभियंता व्हावा असे वाटते. शिक्षकी पेशात प्रसिद्धी, आदर, पैसा मिळतोच पण अत्यंत अवघड आणि व्रतस्थवृत्तीने जंपून घ्यावे लागते. त्यातच नोक-या मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. खासगी संस्थांमध्ये कमी पगारावर काम करावे लागते. परिणामी डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

अर्ज केवळ 250

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम आणि भरती प्रक्रियेचे संचलन करते. औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी 2 हजार 407 एकूण विद्यार्थी क्षमता आहे. गेल्या वर्षी डीएड अभ्यासक्रमासाठी 1 हजार 136 जणांनी प्रवेश घेतला होता. तर 1 हजार 271 जागा रिक्त होत्या. हा आकडा ही मोठा होता. म्हणजे केवळ 50 टक्केच भरती प्रक्रिया झाली होती. यंदा 7 जुलै पर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत केवळ 250 अर्ज दाखल झालेले आहे. हा आकडा डी.एड महाविद्यालयांची चिंता वाढवणारा आहे. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा खूप कमी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत डी.एड. अभ्यासक्रम शिकवणा-या विद्यालयांवर संक्रात पडली होती. प्रवेशाचे प्रमाण पाहता यंदा ही अनेक महाविद्यालयांना टाळे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

एक अंकी विद्यार्थी संख्या

जिल्ह्यात सध्या मराठी, इंग्रजी उर्दू माध्यमांची मिळून एकूण 38 विद्यालये आहेत.यामध्ये मराठी माध्यमाची 26, इंग्रजी 3 आणि 9 विद्यालये उर्दु भाषिकांसाठी आहेत. त्यातील अनेक महाविद्यालयात केवळ एका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यात दोनशे आणि दीडशे विद्यार्थी क्षमता असलेली प्रत्येकी एक विद्यालय तर शंभर विद्यार्थी संख्या असलेली सहा विद्यालये आहेत. तर उर्वरीत विद्यालयांमध्ये 50 ते 30 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेली विद्यालये आहेत.