University Exam : हिंदुत्व, फेसिझम, नाझीवाद मध्ये विद्यार्थ्यांना साम्य शोधायला लावलं ! सोशल मीडियावर टीका, भाजप नेत्याचा वादात सहभाग

| Updated on: May 07, 2022 | 3:53 PM

इतकंच काय तर बीए पॉलिटिकल सायन्सच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे नेते विकास प्रीतम सिंह यांनीही या वादात सहभाग घेतलाय.

University Exam : हिंदुत्व, फेसिझम, नाझीवाद मध्ये विद्यार्थ्यांना साम्य शोधायला लावलं ! सोशल मीडियावर टीका, भाजप नेत्याचा वादात सहभाग
हिंदुत्व, फेसिझम, नाझीवाद मध्ये विद्यार्थ्यांना साम्य शोधायला लावलं !
Image Credit source: facebook
Follow us on

उत्तर प्रदेश  : शारदा विद्यापीठाच्या (Sharda University) बीए राज्यशास्त्र अंतर्गत परीक्षेमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झालीये. सोशल मीडियावर शारदा विद्यापीठावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप होत आहे. इतकंच काय तर बीए पॉलिटिकल सायन्स (BA Political Science) च्या प्रश्नपत्रिकेत (Question Paper) विचारलेल्या प्रश्नाबाबत नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे नेते विकास प्रीतम सिंह यांनीही या वादात सहभाग घेतलाय.

भाजप नेत्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “विद्यापीठाचं नाव ‘शारदा’ पण कृत्याकडे बघा, परीक्षेत विद्यार्थ्यांना ‘हिंदुत्व’ ‘फेसिझम’ आणि नाझीवाद’ यामध्ये काही साम्य आहे का आणि असल्यास सिद्ध करा असं विचारलंय.
ही प्रश्नपत्रिका एका मुस्लिम शिक्षिकेने बनवली होती, असा आरोप आहे.”

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण ?

खरंतर शारदा विद्यापीठात स्तर २०२१-२२ च्या मध्यावधी परीक्षा सुरु आहेत. शुक्रवारी (06 मे 2022) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची बीए राज्यशास्त्र सन्मान (सेमिस्टर-2) परीक्षा घेण्यात आली. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या अ, ब आणि क या तीन विभागात एकूण 8 प्रश्न विचारण्यात आले होत, मात्र सहाव्या प्रश्नामुळे हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. सहाव्या प्रश्नात विद्यार्थ्यांना हिंदुत्वाची तुलना फॅसिझम किंवा नाझीवादाशी करून आपले विचार मांडण्यास सांगण्यात आले.

फॅसिझम आणि नाझीवाद म्हणजे काय ?

फॅसिझम आणि नाझीवाद या दोन विचारधारा आहेत, फॅसिझममध्ये व्यक्तिस्वातंत्र्य मर्यादित असते आणि राज्यांच्या अधिकारांना प्रथम स्थान दिले जाते. सोप्या आणि नेमक्या शब्दात सांगायचे तर हुकूमशाहीचे राज्य. या विचारधारेचा उगम इटलीत झाला. त्याचबरोबर नाझीवाद ही हिटलरची विचारसरणी होती. या दोघामंध्ये बरेच साम्य आहे.

3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शारदा विद्यापीठाने तातडीने ३ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून पेपर तयार करण्याची समिती निलंबित केली. शारदा विद्यापीठाच्या निवेदनात म्हटलं आहे की, सामाजिक विसंवाद निर्माण करण्याची क्षमता असणारी एखादी घटना घडल्याची खंत विद्यापीठाला आहे. आपली राष्ट्रीय अस्मिता आणि संस्कृती बिघडवणाऱ्या प्रत्येक विचारधारेच्या विरोधात विद्यापीठ आहे. एक उच्च शिक्षण संस्था म्हणून आम्ही सभ्यतेच्या पुनरुज्जीवनाच्या व्यापक मिशनसाठी वचनबद्ध आहोत जे आपला धर्म, परंपरा, इतिहास आणि संस्कृतीच्या सर्वोत्कृष्टतेचा उत्सव साजरा करते ज्याने केवळ भारताची कल्पनाच नव्हे तर जगभरातील मानवी ज्ञानाच्या सर्व पैलूंना आकार दिला आहे.