मुंबई : दोनवेळा ऑलिम्पिक विजेती राहिलेली पीव्ही सिंधू (PV Sindhu) सध्या तिच्या एका मोठ्या विधानाने (statement) चर्चेत आली आहे. सिंधूने शुक्रवारी गोवा फेस्टच्या दरम्यान म्हटलंय की, ‘आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर मी कोणताही माझ्या विरोधातला बलाढ्य स्पर्धक नाही निवडू शकत. कारण सर्वच समान स्तरावर आहे. आंतरराष्ट्रीय रॉकिंग काहीही असो, सतर्क राहण्याची नेहमीच गरज असते, असं पी व्ही सिंधू म्हणाली. पुढे बोलताना ती म्हणते, ‘असं वाटतंय की कुणीही बलाढ्य स्पर्धक नाहीये आणि मी सगळ्यांनाच मात दिली आहे. आता सगळेच खेळाडू समान स्तरावर आहेत. आपण चांगल्या रॅकिंगच्या खेळाडूसोबत खेळत असू तर जिंकण्याची आशा नाही केली जाऊ शकत. तसंच कमी रॅकिंगच्या खेळाडूसोबत खेळताना लगेच जिंकता येईल असंही नाही. कोणताही आणि कसाही स्पर्धक समोर असला तरी आपल्याला शंभर टक्केच आपली कामगिरी करावीच लागते,’ असंही पीव्ही संधू यावेळी म्हणाली.