AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू, रात्रीच्यावेळी धक्कादायक घटना, मुंबई हादरली

Mumbai Accident : भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू, रात्रीच्यावेळी धक्कादायक घटना, मुंबई हादरली
Mumbai Bus AccidentImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 29, 2025 | 11:47 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोक कामावरून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हा अपघात झाला आहे. भांडूप स्टेशन वेस्टला झालेल्या या अपघातामुळे मुंबई हादरली आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्या वेळी बसने प्रवाशांनी चिरडले

समोर आलेल्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोक कामावरून घरी जात असताना या ठिकाणी मोठी गर्दी होती, या गर्दीच्या वेळी चालक बस रिवर्स घेताना बस प्रवाशांना धडकली. त्यामुळे अनेक प्रवाशी बसखाली चिरडले गेले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. उपस्थित लोकांनी जखमींना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले.

4 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

भांडूप स्टेशनजवळ बेस्ट बस रिव्हर्स घेत असताना झालेल्या या अपघातात 3 महिला आणि 1 पुरुष अशा 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अज्ञात महिलेचा समावेश आहे, तिचे वय 31 वर्षे असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रशांत लाड या 51 वर्षीय प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी दाखल, तपासाला सुरूवात

या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेच्या वेळी बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?