IAS अधिकारी पूजा सिंघलांच्या खजिन्यावर दुसऱ्या दिवशीही ईडीच्या धाडी, आत्तापर्यंत 19 कोटींची कॅश, 150 कोटींच्या मालमत्ताही जप्त

पूजा सिंघल यांचे पती अभिषेक सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 25 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत.

IAS अधिकारी पूजा सिंघलांच्या खजिन्यावर दुसऱ्या दिवशीही ईडीच्या धाडी, आत्तापर्यंत 19 कोटींची कॅश, 150 कोटींच्या मालमत्ताही जप्त
IAS Pooja and moneyImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:14 PM

रांची आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS officer Pooja Singhal)आणि त्यांच्या नीकटवर्तींयांवर ईडीची( ED) कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. पूजाचे पती अभिषेक झा (Abhishek Jha)यांच्या रांचीच्या पल्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहचले. यासोबतच देशाच्या 11 ठिकाणी प्रकरणी तपास सुरु आहे. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 25 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 16 तास चाललेल्या या कारवाईत सिंघल यांचे सीए सुमनकुमार यांच्या रांची येथील घरातून 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 150 कोटींच्या संपत्तीचे दस्तावेजही ईडीच्या हाती लागले आहेत. ईडीच्या टीमने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांच्या मुज्जफरपूर येथील घरी, तसेच दिल्लीत राहणारे भाऊ, आईवडील आणि इतर सहकाऱ्यांच्या घरीही छापेमारी केली आहे.

मनरेगा घोटाळ्यात मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये छापे घातले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईत सगळी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. खुंटीत झालेल्या मनरेगा घोटाळ्यात ईडीने अधिकारी रामविनोद सिन्हा यांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून 4.25 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे जात असल्याची कबुली त्यांनी चौकशीत दिली. त्यावेळी पूजा सिंघल या तिथे जिल्हाधिकारी होत्या. सुमारे 18 कोटींचा हा मनरेगा घोटाळा असून, त्या प्रकरणात आणि खाणींच्या लिलावात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येते आहे.

कशी झाली कारवाई

खाण सचिव पूजा सिंघल यांच्यावर शुक्रवारी झालेली ईडीची कारवाई अचानक झालेली नाही. याची पार्श्वभूमी आधीपासूनच तयार करण्यात आली. केंद्र सरकारने राजभवनाकडे राज्यातील भ्रष्ट पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी मागितली होती. एका महिन्यापूर्वी अशा चार अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारने राजभवनाला दिली होती. यात रांचीचे जिल्हाधिकारी छवी रंजन, के श्रीनिवासन, सुनील कुमार आणि मनोज कुमार यांच्या नावांचा समावेश होता. राजभवनाने या यादीत सात नावे जोडली होती. अशी 11 नावांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे देण्यात आली होती. राजभवनाकडून जी नावे देण्यात आली त्यात प्रामुख्याने पूजा सिंघल यांचे नाव होते.

अजून काही अधिकारी अडचणीत

राज्यात अजून काही अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यात मुख्यमंत्री कार्यालयातील एक अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या एका नीकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्याप्रमाणे बाहेरच्या कोट्यातून आलेल्या एका प्रभावशाली व्यक्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.