IAS Pooja Singhal: IAS पूजा सिंघल यांच्या चार्टड अकाऊंटकडे 19 कोटीचं घबाड, लिम्का बुकमध्ये नाव ते नक्षल्यांचा हल्ला; कोण आहेत पूजा सिंघल?

IAS Pooja Singhal: चतरा येथे उपायुक्त असताना पूजा सिंघलने रोजगार हमी योजनेतून दोन एनजीओंना 6 कोटी रुपये दिले.

IAS Pooja Singhal: IAS पूजा सिंघल यांच्या चार्टड अकाऊंटकडे 19 कोटीचं घबाड, लिम्का बुकमध्ये नाव ते नक्षल्यांचा हल्ला; कोण आहेत पूजा सिंघल?
लिम्का बुकमध्ये नाव ते नक्षल्यांचा हल्ला; कोण आहेत पूजा सिंघल?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 8:28 AM

रांची: झारखंडमध्ये सकाळपासून ईडीची (ED) छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या चार्टड अकाऊंटच्या दिल्लीतील घरातून मोठं घबाड हस्तगत केलं आहे. ईडीने एकूण 18 ठिकाणी छापेमारी केली आहे. काही लोकेशनवर ईडीचे अधिकारी अजूनही तपास करत आहेत. पूजा सिंघल यांच्या विश्वासातील चार्टड अकाऊंटकडे केलेल्या छापेमारीत ईडीला 19 कोटी 31 लाख रुपये सापडले आहेत. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. निकटवर्तीयावर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा पूजा सिंघल चर्चेत आल्या आहेत. त्यापूर्वीही पूजा सिंघल या ऐनकेन प्रकारे चर्चेत होत्या. लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (limca book of records) नाव नोंद होण्यापासून ते नक्षलवाद्यांनी हल्ला करण्यापर्यंत त्यांचे नाव सतत चर्चेत राहिलं आहे. नोकरीच नव्हे तर त्यांच्या विवाहामुळेही त्या चर्चेत राहिलेल्या आहेत.

21 वर्ष आणि 7 दिवसाचं वय असताना त्यांना आयएएस कॅडरमध्ये प्रवेश मिळाला. अत्यंत कमी वयात आएएस होणाऱ्या अधिकारी ठरल्याने त्यांचं नाव लिम्का बुकमध्ये नोंदलं गेलं. सर्वात कमी वयात आयएएस झाल्यानंतर त्यांनी आयएएस राहुल पुरवार यांच्याशी विवाह केला. मात्र, सुरुवातीच्या काळात दोघांमध्येही खटके उडत होते. त्यानंतर त्यांनी राहुल यांच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी अभिषेक झा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असतानाच अति महत्त्वकांक्षा आणि नवरा तसेच सासरच्या लोकांना लाभ पोहोचवून दिल्याचा त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप होऊ लागला.

हे सुद्धा वाचा

अनेक घोटाळ्यात नाव

चतरा येथे उपायुक्त असताना पूजा सिंघलने रोजगार हमी योजनेतून दोन एनजीओंना 6 कोटी रुपये दिले. याप्रकरणी विधानसभेतही आवाज उठवला गेला. त्यानंतर त्यांना क्लिनचीट मिळाली. त्यानंतर खुंटी जिल्ह्यात उपायुक्त असताना त्यांचं रोहयोच्या 16 कोटींच्या घोटाळ्यात नाव आलं. त्याचा तपास आता ईडी करत आहे. त्यापूर्वी पलामू येथे उपायुक्त असताना पूजा सिंघल यांच्यावर उषा मार्टिन ग्रुपवर कठौतिया कोळसा खाण देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

विषारी सुईने हल्ला

चतरा येथे उपायुक्त असताना पूजा सिंघल यांच्यावर नक्षलवाद्यांनी विषारी सुईने हल्ला केल्याचं वृत्त आलं होतं. पूजा यांना तातडीने इरबा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी स्वत: विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा होती. मात्र, कुणावर कोणतीही केस होऊ नये म्हणून नक्षल्यांनी हल्ला केल्याचं सांगितलं गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.