Anjali Arora : ‘महाकाव्य श्री रामायण कथा’चा ट्रेलर समोर, अंजली अरोरावर नेटकऱ्यांना साधला निशाणा

2026 या वर्षात ‘रामायणा’वर तीन चित्रपट येणार आहेत. रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चा ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच. पण आता अंजली अरोराच्या ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ चा ट्रेलरही नुकताच समोर आला आहे. त्यावरून विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

Anjali Arora : महाकाव्य श्री रामायण कथाचा ट्रेलर समोर, अंजली अरोरावर नेटकऱ्यांना साधला निशाणा
Image Credit source: social media
| Updated on: Sep 17, 2026 | 3:45 PM

2026 या वर्षात मोठ्या पडद्यावर रामायणची कहाणी वेगवेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ ट्रेलर समोर आला, तो बराच गाजलाही, लोकाना तो पाहण्याची मोठी उत्सुकता आहे. तर आता आणखी एक रामायण मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंजली अरोरा हिच्या ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या फिल्मचा ट्रेलरही आता रिलीज झाला आहे. हा ट्रेलर समोर येताच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. या चित्रपटाचे डायलॉग्स पासून ते कलाकरांचा लूक आणि व्हीएफएक्स पर्यंत, प्रत्येक मुद्यावर नेटकऱ्यांनी त्यांची मतं मांडली आहेत. एवढंच नव्हे तर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी या चित्रपटाची तुलना प्रभास आणि ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ शी देखील केली.

सीतामाईच्या भूमिकेत अंजली अरोरा

दरम्यान ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ मध्ये अंजली अरोरा ही सीतामाईच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक समोर आल्यावर सोशल मीडियावर, त्यावरून बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया आल्यात. काही लोकांना तिचा लूक आवडला. मात्र काही युजर्सना तर तिचा लूक, अभिनय आणि डायलॉग्स म्हणण्याची तिची पद्धत यावर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडीयावर अनेकांनी तिला ट्रोलही केलं.

अंजली अरोरा झाली ट्रोल

या चित्रपटाचा ट्रेलर अंजलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. त्यावर बरेच लाईक्स आणि कमेंट्स तर आल्या, पण अनेकांनी तिच्यावर टीका केली, तिला ट्रोल केलं. सॉरी, पण सीतामाईच्या भूमिकेसाठी हे अतिशय अयोग्य कास्टिंग आहे, असं एकाने कमेंटमध्ये लिहीलं. सीतामाईच्या रोलमध्ये शूर्पणखा, अशी एक खोचक कमेंट करत एकाने अंजली अरोरावर निशाणा साधला. ॲडव्हान्समध्ये फ्लॉप ( चित्रपट) लिहून टाकतो, असं आणखीन एका युजरने लिहीलं.
तर ही मूव्ही बॅन करा, ती ( अंजली अरोरा) सीतामाईची भूमिका कशी साकारू शकते, असं म्हणत एका युजरने संताप व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us