Kapil Sharma : 550 रुपयांना चहा, पाणीपुरी 800 रुपये! कपिल शर्माच्या महागड्या कॅफेतील सर्वात स्वस्त पदार्थ कोणता ?
कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे' मध्ये फायरिंग मुळे तो बराच चर्चेत असतो. आता या क2फेमधील महागडा मेन्यू समोर आला आहे. तिथला चहा 500 ला तर पाणीपुरी प्लेट 800 रुपयांच्या जवळपास आहे. जाणून घ्या डिटेल्ड मेन्यू..

गेल्या वर्षी जुलै महिन्यात कॅनडामध्ये पहिला ‘कॅप्स कॅफे’ (Kap’s Cafe) आउटलेट उघडल्यानंतर, कॉमेडिअन कपिल शर्माने आता त्याच्या या ब्रँडचा विस्तार दुबईपर्यंत केला आहे. 31 डिसेंबर 2025 ला त्याने अल किफफ (Al Kifaf) येथे आणखी एक नवं आउटलेट उघडलं. कॉमेडिअन भारती सिंगने नुकतीच दुबईतील या कॅफेला भेट दिली. हलका गुलाबी आणि पांढऱ्या रंगात या कॅफेची सजावट करण्यात आली असून त्यात हलकी सोनेरी रंगाची छटाही दिसते.
मात्र या कॅफेतील मेन्यू आणइ त्याच्या किमती सध्या भलत्याच चर्चेत आहेत. मेन्यूमध्ये बरीच ड्रिंक्स, वेगवेगळे केक, भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थही आहेत. मात्र या कॅफेत मिळणआऱ्या पदार्थांच्या किमती फारच हैराण करणाऱ्या आहेत. तिथे एक कप मसाला चहा 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीला असून देशी पाणीपुरीचं एक सर्व्हिंग तब्बल 800 रुपयांना आहे. या मेन्यूतला सर्वात महागडा पदार्थ आहे चीज पेने पास्ता – त्याची किंमत आहे 1,604 रुपये.. तर या कॅफेत मिळणारी सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे – एस्प्रेसो- त्यासाठी 490 रुपये मोजावे लागतात.
कॅप्स कॅफेमध्ये महागड्या डिशेस
कॅप्स कॅफेमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय, दोन्ही पद्धतीचे पदार्थ मिळतात. मात्र, येथे अगदी साध्या आणि नेहमीच्या खाद्यपदार्थांच्या किमतीही चांगल्याच महाग आहेत. येथे एका डोशाची किंमत 775 रुपये आहे, तर बॉम्बे सँडविच आणि अॅव्होकॅडो टोस्ट या दोन्ही पदार्थांची किंमत प्रत्येकी 1,034 रुपये आहे. शेवपुरीची एक प्लेट 905 रुपयांना मिळते, तर फ्रेंच टोस्टसाठी 1300 रुपये मोजावे लागतात.
कपिलच्या कॅफेमधील मेन्यूचे दर
या मेन्यूमध्ये मेक्सिकन बाउल, बटर चिकन आणि पॅनकेक्स यांचाही समावेश आहे. एका आलू पराठ्याची किंमत 700 रुपये, तर डाळ मखनीची किंमत 1035 रुपये इतकी आहे. खास पदार्थांमध्ये 550 रुपयांचा मसाला चहा आणि 800 रुपयांची पाणीपुरी यांचा समावेश आहे. भारतीयांच्या आवडीच्या नेहमीच्या पदार्थांनाही येथे प्रीमियम स्वरूप देण्यात आले आहे.
या कॅफेची सजावट पॅरिसमधील पेस्ट्री शॉप्सपासून (पॅटिसरी) प्रेरित असल्याचं मजतं. कॅफेच्या इंटिरिअरमध्ये पेस्टल गुलाबी रंग, आयव्हरी रंगाची छटा, पांढरे मार्बल आणि सोनेरी सजावटीचा वापर करण्यात आला आहे. या रंगसंगतीमुळे कॅफेला आलिशान आणि आकर्षक लुक मिळाला आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ खाद्यपदार्थांसाठीच नव्हे, तर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करण्यासाठीही खास ठरताा दिसतं.
कॅफेवर फायरिंग
गेल्या वर्षी कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’ (Kap’s Cafe) वर झालेल्या गोळीबारामुळे, कॅफे बरच चर्चेत होता. हा कॅफे उघडल्यावर अवघ्या काही दिवसांतच तिथे गोळीबार झाला, त्यानंतर ऑगस्टमध्ये आणखी एक हल्ला झाला. तर ऑक्टोबरमध्ये चालत्या गाडीतून गोळीबार करण्यात आल्यामुळे कॅफेच्या काचा फुटल्या. काही रिपोर्ट्सनुसार,या घटनानंचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडण्यात आला खरा, मात्र या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. सुदिैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही
गोळीबारानंतर काय म्हणाला कपिल ?
या हल्ल्यावर कपिलने प्रतिक्रिया दिली होती. नोव्हेंबरमध्ये आपल्या ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, त्याला या हल्ल्यांबाबत विचारले असता कपिल शर्माने बेफिकीरपणे उत्तर दिले.“गोळीबाराच्या प्रत्येक घटनेनंतर कॅफेला आधीपेक्षाही चांगली ओपनिंग मिळाली. त्यामुळे देव माझ्या पाठीशी असेल, तर सर्व काही ठीक होईल” असं तो माध्यमांशी बोलताना म्हणाला. सध्या तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ होस्ट करताना दिसत आहे.