आमिर खान याच्या दोन्ही पत्नींमध्ये कसं आहे नातं? दुसरी पत्नी म्हणाली, ‘घटस्फोट झाला म्हणून…’

Aamir Khan : आता एकटं आयुष्य जगणाऱ्या आमिर खान याच्या दोन पत्नींमध्ये कसं आहे नातं? अभिनेत्याची दुसरी पत्नी किरण राव अखेर व्यक्त झालीच, पहिली पत्नी आणि आयरा खानबद्दल म्हणाली..., आमिर खान कायम त्याच्या कुटुंबामुळे असतो चर्चेत.

आमिर खान याच्या दोन्ही पत्नींमध्ये कसं आहे नातं? दुसरी पत्नी म्हणाली, घटस्फोट झाला म्हणून...
| Updated on: Feb 04, 2024 | 9:48 AM

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : अभिनेता आमिर खान त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान याने पहिली पत्नी रिना दत्त हिला घटस्फोट दिल्यानंतर निर्माती किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण हिने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. किरण आणि आमिर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आमिर आणि किरण यांनी 2005 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर किरण हिने 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये किरण आणि आमिर यांनी एकमेकांना घटस्फोट दिला..

आमिर खान याचं दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट झाला असला तरी, कुटुंब म्हणून आमिर याचे दोन्ही कुटुंब एकत्र राहातात. एवढंच नाही तर, एकाच हाऊसिंग सोसायटीमध्ये आमिर याचे दोन्ही कुटुंब राहतात. नुकताच झालेल्या एका मुलाखती किरण हिने आमिर याच्या पहिल्या कुटुंबासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

किरण राव म्हणाली, ‘घटस्फोट झाला म्हणजे कुटुंब विभक्त होईल असं नसतं. आयरा हिच्या लग्नात माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित होता. ही एक अशी गोष्ट आहे. ज्यावर आम्ही कायम विचार करत असतो. संपूर्ण खान कुटुंब एक आहे.’

‘आम्ही प्रत्येक सोमवारी एकत्र येतो. आम्ही प्रचंड गप्पा मारतो. सगळे एकत्र बसतो. वेळ व्यतीत करतो. आमिर याची पहिली पत्नी रिना दत्ता हिच्यासोबत माझं चांगलं नातं आहे. आयरा आणि झुनैद यांच्यासोबत देखील माझं नातं चांगलं आहे. आम्ही सगळे एकाच हाऊसिंग सोसायटीमध्ये राहातो..’

‘घटस्फोट झाला याचा अर्थ तुमचे संबंध देखील संपले असं होत नाही. माझी सासू, ननंद, रीना आम्ही एकत्र राहतो. आमिर याच्यासोबत माझा घटस्फोट झालाय पण कुटुंब विभक्त झालेलं नाही…’ असं देखील आमिर खान याची दुसरी पत्नी किरण राव म्हणाली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण राव हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आमिर खान याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच आमिर याची लेक आयरा हिचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us