धक्कादायक खुलासा! त्या सुपरस्टार्सला केलं होतं टार्गेट, पण ऐनवेळी टायगर श्रॉफला धरलं..

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मोठा हल्ला करण्यात आला. आरोपींना राजस्थानच्या कोटामधून मुंबईत आणले. यादरम्यानच पायाखालची जमीन सरकणारी माहिती पुढे येतंय. या आरोपींच्या निशाण्यावर आणखी बडे कलाकार असल्याची माहिती पुढे येतंय.

धक्कादायक खुलासा! त्या सुपरस्टार्सला केलं होतं टार्गेट, पण ऐनवेळी टायगर श्रॉफला धरलं..
Amitabh Bachchan Aamir Khan Akshay Kumar
| Updated on: Oct 21, 2026 | 7:19 AM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करण्यात आला. मुंबईतील जुहू परिसरात हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत वर्दळीच्या आणि चाहत्यांच्या घोळक्यात हा गोळीबार करण्यात आला. एक पिस्तुल जाम झाल्याने थोडक्यात टायगर वाचला. तिन्ही आरोपी पळून दिल्लीच्या दिशेने निघाले होते. मात्र, कोटा रेल्वे स्थानकात त्यांना ताब्यात घेण्यात आले. आता या तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले. त्यांचे मेडिकलही करण्यात आल्याची माहिती मिळतंय. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. फक्त टायगर श्रॉफ हाच नाही तर अजून काही बॉलिवूड कलाकार या हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. हैराण करणारी बाब म्हणजे अनेक बड्या कलाकारांच्या घराची रेकी या आरोपींकडून करण्यात आली.

थेट अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांची रेकी करण्यात आल्याची माहिती मिळतंय. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला. टायगर श्रॉफ न्हवे तर याच्यासोबत अनेक बडे कलाकार त्यांच्या निशाण्यावर होती.  टायगर श्रॉफपूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार आरोपींच्या निशाण्यावर होते. त्यांच्या घराची रेकी करण्यात आली.

Loading...

त्यांच्या घराची रेकी करण्यासोबतच थेट ते कुठे जातात, यावरही आरोपींचे लक्ष होते. आरोपीनी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांची रेकी केल्याचे स्पष्ट झाले. लॉरेन्स गँगचा हस्तक अनिल पंडित याने मोठ्या स्टारला टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याचे तपासात उघड झाले. शूटर्सने अभिनेत्यांच्या घरांची रेकी करून व्हिडिओ आरोपी अनिल पंडितला पाठवले.

पण कडेकोट सुरक्षेमुळे त्यांनी या कलाकारांवर हल्ला करण्याचा आपला प्लान बदलला. त्यानंतर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. सात दिवस रेकी केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. त्यापूर्वी त्यांनी टायगर श्रॉफची पूर्ण माहिती काढली. हरियाणातील कुनाल, सुमित आणि उत्तर प्रदेशातील राधा, बबिता या आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी तिघांना कोटामधून अटक केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us