हॉस्पिटलच्या बेडवर दिसल्या दिग्गज अभिनेत्री; नाकात ट्यूब पाहून चाहते चिंतेत, नेमकं झालंय तरी काय?

ऐंशी आणि नव्वदचा काळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री डिस्को शांती यांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर करून रुग्णालयातून परतल्याची माहिती दिली. त्यांचा हा फोटो पाहून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.

हॉस्पिटलच्या बेडवर दिसल्या दिग्गज अभिनेत्री; नाकात ट्यूब पाहून चाहते चिंतेत, नेमकं झालंय तरी काय?
Actor Disco Shanthi
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 17, 2026 | 11:33 AM

Actor Disco Shanthi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर डिस्को शांती यांच्या एका हॉस्पिटलमधील फोटोने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. 1980-90च्या दशकात आपल्या नृत्य आणि ग्लॅमरस भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या डिस्को शांती यांनी सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्या नाकातून एक ट्यूब लावलेली दिसत आहे. मात्र, आपल्या प्रकृतीबाबत त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.

डिस्को शांती यांनी हॉस्पिटलमधील फोटोसोबत ‘बॅक टू होम’ (घरी परतले) असा छोटासा संदेश लिहिला. त्यामुळे त्या हॉस्पिटलमधून घरी परतल्याचं स्पष्ट होतंय. मात्र, त्यांना नेमकं काय झालं होतं, कोणत्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं किंवा त्यांच्यावर कोणते उपचार झाले, याबाबत त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांचा फोटो पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डिस्को शांती यांची पोस्ट-

जवळपास तीन दशकांनंतर पडद्यावर कमबॅक

डिस्को शांती यांनी 1980 आणि 1990च्या दशकात तमिळसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. विशेषतः डान्स नंबर आणि ग्लॅमरस भूमिकांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या कारकिर्दीच्या काळात त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं. अभिनेता श्रीहरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर डिस्को शांती यांनी चित्रपटांपासून अंतर घेतलं. 2013 मध्ये श्रीहरी यांचं निधन झाल्यानंतर त्या मनोरंजनसृष्टीपासून आणखी दूर राहिल्या. आता जवळपास 28 वर्षांनंतर ‘पुल्ला’ या प्रोजेक्टमधून त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात येणार असल्याचं वृत्त आहे.

डिस्को शांती यांचा मुलगा मेघांश श्रीहरी देखील तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरू करत आहे. अशा वेळी डिस्को शांती यांच्या हॉस्पिटलमधील फोटोने चाहत्यांना काळजीत टाकलं आहे. सध्या त्यांनी घरी परतल्याची माहिती दिली असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

डिस्को शांती यांचे नाव 80 आणि 90 च्या दशकातील लोकप्रिय डान्सर्स आणि अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जातं. त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि ओडिया अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः त्यांच्या डान्स नंबरची त्यावेळी मोठी चर्चा होती. 1983 मध्ये ‘वसंतमे वरुगा’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर विविध भाषांमध्ये त्यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us