माफी मागत पाया पडण्याची वेळ सोनाली कुलकर्णी हिच्यावर, थेट या अभिनेत्याच्या..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत अभिनेत्री अनेकदा सॉरी सॉरी सॉरी सॉरी म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

माफी मागत पाया पडण्याची वेळ सोनाली कुलकर्णी हिच्यावर, थेट या अभिनेत्याच्या..
sonali kulkarni and Sachin Pilgaonkar
| Updated on: Oct 23, 2026 | 9:57 AM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गप्पांमध्ये इतकी जास्त रमली की, तिला आपल्या आजुबाजूला नक्की कोण आहे, याचेही भान राहिले नाही. कापूसकोंडा चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान ही घटना घडली. हा चित्रपटच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीले येईल. चित्रपटाच्या प्रीमियरला मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. यादरम्यानच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सचिन पिळगांवकर यांचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या व्हिडीओत अनेकदा सचिन पिळगांवकर यांची माफी मागताना दिसत आहे. फक्त माफी नाही तर सर वेरी वेरी वेरी वेरी सॉरी म्हणत सचिन पिळगांवकर यांच्या पायाही पडताना सोनाली कुलकर्णी दिसत आहे. त्यानंतर सचिन पिळगांवकर यांना मिठी सोनाली कुलकर्णी हिने मारली.

कापूसकोंडा चित्रपटाच्या प्रीमियरला सोनाली कुलकर्णी ही आपल्या मैत्रिणींसोबत उपस्थित होती. यावेळी त्यांचा गप्पांचा चांगलाच फंड रंगला. सोनालीचे पूर्ण लक्ष गप्पांमध्ये होते. यावेळी मागून अचानक सचिन पिळगांवकर येतात आणि त्यांना सोनाली कुलकर्णीच्या खांद्यावर हात ठेवला. अचानक आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचे लक्षात येता, सोनाली कुलकर्णी मागे वळून पाहते तर काय सचिन पिळगांवकर ही तिच्या मागे उभे आहेत.

Loading...

सचिन पिळगांवकर यांना पाहून तिला धक्काच बसतो. काय करावे, हे दिला कळतही नाही. तिने सचिन पिळगांवकर यांची माफी मागितली. तुम्ही मला मागे उभे राहिल्याचे माहितीच नसल्याचे सांगत ती माफी मागते. सॉरी सर एक्स्ट्रिमली सॉरी… वेरी वेरी वेरी सॉरी सर म्हणताना ती दिसत आहे. लगेचच ती सचिन पिळगांवकर यांच्या पायाही पडते. त्यांना प्रेमाने मिठी मारते.

सचिन पिळगांवकर हिच्याकडे उपस्थित लोक पाहतच राहिले. यातून सोनाली कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेत्यांचा किती जास्त सन्मान करते, हे स्पष्ट होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून तिचे काैतुक केले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us