‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने एक कविता म्हणून दाखवलीय. या कवितेत तीने अप्रत्यक्षपणे सध्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय.

आमचं इथे व्यवस्थित चाललंय, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!
spruha joshi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 10:11 PM

Spruha Joshi Poem : सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची देशभरात चर्चा होत आहे. या आंदोलात देशातील हजारो तरुण सहभागी झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी काही मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत. सोबतच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतरचे मैदान सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिनेदेखील कवितेच्या माध्यमातून सीजेपीच्या या आंदोलना पाठिंबा दिलाय.

स्पृहा जोशीच्या कवितेची चर्चा

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने एक कविता म्हणून दाखवलीय. या कवितेत तीने अप्रत्यक्षपणे सध्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय. तिने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सोबतच डिसक्लेमर म्हणून “या कवितेचा कोणत्याही जीवित , मृत .. मृत होऊ घातलेल्या, अथवा आतून मृत झालेल्या व्यक्ती, संवेदनशीलता वा लोकशाहीशी पूर्ण संबंध आहे!” असं म्हटलंय.

स्पृहा जोशीच्या कवितेत काय आहे?

स्पृहा जोशीने तिच्या कवितेला आक्रंदन असं नाव दिलंय.

आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय
संवदेनाहीन कोशात आम्ही स्वत:ला गुरफटलंय.
आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय
रोजच उठून चालू आहे
निष्पापांचं आक्रंदन,
घुसमटणाऱ्या श्वासांचं रोजचंच आहे मुक रुदण,
बोलू पाहणाऱ्या आवाजाला
आम्ही कधीच गप्प केलंय,
किती बॉम्बस्फोट, किती दंगली
माणसं मरतायत मरू दे,
आपण त्यात नव्हतो ना,
चला आजची रात्र टळू दे,
उपोषणं होतात, मोर्चे निघतात,
झुरळं चक्क रस्त्यावर उतरतात
मत, विरोध, धर्म, अजेंडा
चर्चा बिर्चा नकोच काही
मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले
हे तर नुसते देशद्रोही
निर्लज्जपणे आम्ही स्वत:ला ठासून सांगितलंय
संवदेनाहीन कोशात आम्ही स्वत:ला गुरफटलंय.

अशी कविता स्पृहा जोशीने पोस्ट केलीय. तिच्या या पोस्टमुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.

 

Follow Us