Aditya And Ananya: गुपचूप ‘या’ठिकाणी प्रेमाचा आनंद घेत आहेत आदित्य – अनन्या ! फोटो पाहून म्हणाल…

आदित्य - अनन्या यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण... 'या'ठिकाणी दोघे एकत्र पण...; फोटो पाहून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांची चर्चा...

Aditya And Ananya: गुपचूप याठिकाणी प्रेमाचा आनंद घेत आहेत आदित्य - अनन्या ! फोटो पाहून म्हणाल...
| Updated on: Jul 12, 2023 | 2:39 PM

मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण.. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या नात्याबद्दल. गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि अनन्या यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण आतापर्यंत दोघांपैकी कोणीही नात्याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. अनन्या आणि आदित्य यांच्या नात्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. दोघे देखील एक म्यूझिक कँसर्टमध्ये सहभागी झाले आहेत. ज्यामुळे आदित्य आणि अनन्या खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण दोघांच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ज्यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही.

अनन्या – आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. फोटोमध्ये दोघे एकत्र दिसत नसले तरी, अनन्या आणि आदित्य एकाच ठिकाणी आहेत… हे सोशल मीडियामुळे समोर आलं आहे. मंगळवरी अनन्या हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केली. ज्यामध्ये अभिनेत्री स्पेन याठिकाणी आर्कटिक मंकीज यांच्या म्यूझिक कँसर्टचा आनंद घेताना दिसत आहे…

 

 

व्हिडीओ पोस्ट करत अनन्याने कॅप्शनमध्ये, ‘आर्कटिक मंकीज यांच्यासारखं दुसरं काहीच नाही… झालं आवडतं गाणं…’ तर दुसरीकडे आदित्य याने देखील त्याच गायकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदित्य आणि अनन्या यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे…

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर याने अनन्या आणि आदित्य यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. रणबीर म्हणाला होता, ‘मला माहिती आहे, आदित्य याला एक मुलगी आवडते आणि तिचं नाव ‘A’ अक्षरापासून सुरु होतं..’ एवढंच नाही तर, करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये देखील दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.

अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील अनन्या आणि आदित्य यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. शिवाय अनेक ठिकाणी अनन्या आणि आदित्या यांना स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनन्या – आदित्य खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही.. कळू शकलेलं नाही.

आदित्य आणि अनन्या यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच अनुराग बासू यांच्या ”मेट्रो इन दिनों’ सिनेमात दिसणार आहे. तर अनन्या आयुष्मान खुराना याच्यासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमात दिसणार आहे.