दो तरह के लोगों से दूर… अमिताभ बच्चन यांचं पहाटे 5 वाजता ट्वीट; नेटकरीही झाले हैराण

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा गोंधळात टाकणारे ट्वीट केले आहे. त्यांनी दोन ट्वीट केली आहे. पण त्यातील एकाही ट्वीटचा नेमका अर्थ नेटकऱ्यांना समजला नाही. त्यामुळे बिग बींचे ट्वीट पाहून पुन्हा एकदा सगळे विचार करातायत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या ट्वीटवर मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत.

दो तरह के लोगों से दूर... अमिताभ बच्चन यांचं पहाटे 5 वाजता ट्वीट; नेटकरीही झाले हैराण
Amitabh Bachchan confusing tweet
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2025 | 1:00 PM

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या उर्जेबद्दल नक्कीच सर्वांना आश्चर्य वाटतं. अमिताभ बच्चन हे कितीही व्यस्त असले तरी देखील ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांच्या कामाबद्दलचे, तसेच त्यांचे विचार देखील ते त्याच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. बिग बी कामात कितीही व्यस्त असले तरी देखील ते रात्री ट्वीट करत आपल्या चाहत्यांशी कही ना काही अपडेट शेअर करतच असतात. यासाठी ते नेहमीच वेळ काढतात.

पुन्हा एकदा बिग बी यांचे गोंधळात टाकणारे ट्वीट 

हे नेहमीच पाहिलं गेलं आहे की बिग बी रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण अमिताभ जेव्हा ट्वीट करतात तेव्हा ते काही वेळेला नेटकऱ्यांना समजत नाही.किंवा अमिताभ यांना नक्की काय बोलायचं आहे याबद्दल नेटकऱ्यांचा गोंधळ होतो. आता पुन्हा एकदा बिग बी यांनी पुन्हा तेच केलं. 17 ऑक्टोबर रोजी पहाटे  एक ट्वीट केले आणि 18 तारखेला दुसरे ट्विट केले. दोन्ही ट्विटमुळे वापरकर्ते गोंधळले आणि त्यांनी विविध कमेंट्स करायला सुरुवात केली. काहींनी तर असंही म्हटलं की अमिताभ बच्चन यांची मानसिकता एका लहान मुलामुळे खराब झाली आहे.


‘अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे’

अमिताभ बच्चन यांनी 17 ऑक्टोबर रोजी ट्विट केले होते, “टी 5534 – या जगात दोन प्रकारचे लोक असतात. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे.” त्यानंतर त्यांनी 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दुसरे ट्विट केले आणि या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते “बनावट! बस्स.” हे दोन ट्विट पाहून नेटकरी पुन्हा गोंधळले आणि बिग बींना विचारू लागले की त्यांनी कोणत्या दोन प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे. काहींनी रेखा आणि जया बच्चन यांची नावे घेत अमिताभ बच्चन यांना चिडवण्यास सुरुवात केली. इतरांनी “केबीसी 17” मधील 10 वर्षांचा स्पर्धक इशित भट्टचा उल्लेख करत कमेंट्स केल्या.


युजर्सच्या कमेंट्स 

एका युजरने लिहिले, “एका लहान मुलाने बिग बींचे मानसिक संतुलन बिघडवले आहे.” दुसऱ्याने लिहिले, ” तर एकाने लिहिले की सर तो मुलगा उद्धटच होता. तुम्ही काळजी करू नका.” दुसऱ्याने लिहिले, “सर, तो फक्त एक लहान मूलगा होता.” नुकत्याच एका एपिसोडमध्ये 10 वर्षांचा इशित “केबीसी 17 ज्युनियर्स” मध्ये हॉट सीटवर बसला होता. इशित ज्या पद्धतीने अमिताभ यांच्यासोबत वागला त्यावरून सर्वजनच त्याच्यावर टीका करताना दिसत आहे. तथापि त्यावेळी अमिताभ यांनी संयम बाळगला आणि शांत राहिले. आता, अमिताभ यांच्या पोस्ट आणि ट्विट्सना त्याच घटनेशी जोडलं जात आहे. पण अमिताभ यांनी या कमेंट्सवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांचे ट्वीट अशा पद्धतीने करतात की बहुतेकजणांना त्याचा अर्थही माहित नसतो.