एक-दोन नाही तर 25 चित्रपटांमध्ये होती एक खास गोष्ट; वर्षभरातच 11 चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या अभिनेता ओळखलं का?
गेल्या 5 दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या. विशेष म्हणजे, एका अभिनेत्याने तब्बल 25 चित्रपटांमध्ये सेम टु सेम नावाची भूमिका साकारली असून, त्यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी इन्स्पेक्टर विजय खन्ना यांची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे त्यांच्या कारकिर्दीला महत्त्वाचे वळण मिळाले. जया बच्चन, प्राण आणि अजित हे कलाकारही चित्रपटात होते.
‘दीवार’मध्ये अमिताभ यांनी विजयची भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आजही हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा मानला जातो.
‘डॉन’ चित्रपटातही अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेचे नाव विजय होते. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यातील गाणी आणि संवाद आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटात अमिताभ यांनी विजयची भूमिका साकारली. चित्रपटात कौटुंबिक संघर्षाची कथा पाहायला मिळाली. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली.
शान’ आणि ‘दोस्ताना’ या चित्रपटांमध्येही अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेचे नाव विजय होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यामुळे विजय हे नाव त्यांच्या चित्रपट कारकिर्दीशी जोडले गेले.