अमिताभ बच्चन यांची हिरोईन, एका सिनेमात झाली मोठी स्टार, पण 7 महिन्यांची प्रेंग्नेंट असताना हृदयद्रावक निधन
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली. पण एका अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण 7 महिन्यांची प्रेंग्नेंट असताना हृदयद्रावक निधन... आजही तिच्या रंगलेल्या असतात चर्चा...

बॉलिवूडचे महानायक आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी स्क्रिन शेअर केली आहे. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. पण एका अभिनेत्रीचं विमान अपघातात निधन झालं. अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीनं नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलें होतं, तेव्हाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवाने, ती सात महिन्यांची गर्भवती होती. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
अमिताभ बच्चन यांची अभिनेत्री
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, ‘सूर्यवंशम’ सिनेमातील मुख्य अभिनेत्री सौंदर्य आहे, जिचं अवघ्या 31 व्या वर्षी निधन झालं. सौंदर्याने 1999 साली ‘सूर्यवंशम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही जेव्हा अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जातो, तेव्हा प्रेक्षकांना तिची आठवण येते. या सिनेमामुळे सौंदर्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
विमान अपघातात निधन
फिल्मी करियरमध्ये सौंदर्या हिने फक्त एकाच बॉलिवूड सिनेमाक काम केलं. पण साउथ सिनेमाविश्वात सौंदर्या हे नाव फार मोठं होतं. तिने कन्नड, तामिळ, मल्याळम सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असायची. तर अभिनेत्री असा आणि इतक्या लवकर शेवट होईल याचा विचार देखील चाहत्यांनी केला नसेल. 17 एप्रिल 2004 मध्ये अभिनेत्रीचं निधन झालं.
घटना घडली तेव्हा 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती अभिनेत्री
घटना इतकी भयानक होती की, कुटुंबियांना अभिनेत्रीचं मृतदेह देखील मिळालं नाही. खरं तर, त्याच वर्षी सौंदर्याने राजकारणात प्रवेश केला. ती भाजपमध्ये सामील झाली होती आणि पक्षाच्या सभेसाठी खासगी विमानाने तेलंगणा मधील करीमनगरयेथे प्रवास करत होती. दुर्दैवाने, अभिनेत्रीच्या विमानाचा अपघात झाला, ज्यात सौंदर्याचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा भाऊ आणि इतर दोन जणांचाही मृत्यू झाला. असं सांगितलं जातं की, त्यावेळी सौंदर्या सात महिन्यांची गर्भवती होती. 2003 मध्ये सौंदर्याने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केलं होतं, पण त्यांचा संसार फुलण्याआधी संपला.