Amitabh Bachchan : फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारावर जगतायेत बिग बी, वयाच्या 83 व्या वर्षी करतायेत अनेक गंभीर आजारांचा सामना
Amitabh Bachchan Health Issues : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल लहानशी माहिती जरी समोर आली, तर चाहते चिंता व्यक्त करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, वयाच्या 83 व्या वर्षी बिग बी अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहेत.

Amitabh Bachchan Health Issues : महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भरतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशात बिग बींच्या आरोग्याबद्दल लहानशी जरी माहिती समोर आली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करतात. नुकताच, बिग बींनी सर्जरी झाल्यानंतर घरी परतताच ब्लॉग पोस्ट केला. ज्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण कोणती सर्जरी झाली याबद्दल बिग बींनी सांगितलं नाही. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर येत आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की, अमिताभ बच्चन फक्त 25 टक्की लिव्हरवर जिवंत आहेत. सांगायचं झालं तर, वयाच्या 83 व्या वर्षी बिग बी अनेक गंभीर समस्यांचा सामना करत आहेत.
फक्त 25 टक्के लिव्हर जगत आहेत अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक गोष्ट आज प्रत्येकाला माहिती असेलच. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, बिग बी गंभीर जखमी झालेले. अभिनेता पुनीत इस्सर याच्यासोबत एका फायटिंग सीन दरम्यान बिग बींच्या पोटात मोठी दुखापत झालेली आणि ते रक्त बंबाळ देखील झालेले. अशात त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांनी क्लिनिकली डेड घोषित केलं. पण बिग बी बचावले. या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांचं लिव्हर पूर्णपणे निकामी झालेलं.
सांगायचं झालं तर, रक्तसंक्रमणामुळे त्यांच्या शरीरात ‘हिपॅटायटीस बी’चा विषाणूने प्रवेश केला, ज्यामुळे त्यांचं 75% यकृत खराब झालं. ‘बिग बी’ आता केवळ 25% कार्यरत असलेल्या लिव्हरच्या आधारे जगत आहेत. त्यांनी स्वतः 2019 मधील एका कार्यक्रमात ही माहिती दिली होती की, ते ‘हिपॅटायटीस बी’ने ग्रस्त आहेत.
अस्थमाने ग्रस्त आहेत अभिनेते
अमिताभ बच्चन अस्थमा सारख्या आजाराचा देखील सामना करत आहे. एकदा तर शूट दरम्यान त्यांनी इन्हेलरचा वापर करताना देखील पाहण्यात आलं आहे. ते कायम त्यांच्याजवळ इन्हेलर ठेवतात. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना कायम श्वास घेण्यास त्रास होतो.
स्पायनल टीबी
अमिताभ बच्चन यांनी ‘स्पाइनल टीबी’ या आजाराचाही सामना केला आहे. दीर्घकाळ चाललेल्या उपचारानंतर ते यातून बरे झाले. ‘बिग बी’ यांना या आजाराबद्दलची माहिती सर्वप्रथम 2000 साली, त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचं चित्रीकरण सुरू असताना मिळाली. 2023 मध्ये त्यांनी स्वतः ‘केबीसी’च्या मंचावरून या आजाराबद्दल माहिती दिली होती.
मायस्थेनिया ग्रेविस
अमिताभ बच्चन यांनी मायस्थेनिया ग्रविस या आजाराचा देखील सामना केला आणि त्यावर मात देखील दिली. केबीसी 15 मध्ये अमिताभ बच्चन यांनी या आजाराबाबत मोठं वक्तव्य केलेलं. हा आजार स्नायूंशी संबंधित आहे. यामध्ये छाती आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात, तसेच बोलण्यात आणि श्वास घेण्यासही अडचण येते.
डायव्हर्टिक्युलायटिस
रिपोर्टनुसार, 2018 मध्ये तीव्र पोटदुखीमुळे ‘बिग बी’ डॉक्टरांकडे गेले असता, त्यांना ‘डायव्हर्टिक्युलायटिस’ (diverticulitis) नावाचा गंभीर आजार असल्याचं कळलं. ही समस्या त्यांच्या आतड्यांमध्ये होती आणि त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सांगायचं झालं तर, आज वयाच्या 83 व्या वर्षी इतक्या आजारांता सामना करत असताना देखील बिग बी बॉलिवूडमध्ये अद्यापही सक्रिय आहेत.