Kavya Maran Wedding: ठरलं! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

Kavya Maran Wedding: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

Kavya Maran Wedding: ठरलं! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर
Kavya Maran
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 9:29 AM

सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील ‘सनराइजर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारनशी लग्न करणार आहे. आता त्यांच्या लग्नाची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. संगीतकार आणि काव्या मारन ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी त्यांचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. देशातील बड्या कलाकारांना तसेच नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. अनिरुद्ध रविचंदर किंवा काव्या मारन यांच्यापैकी कोणीही याबाबत अधिकृतपणे लग्न किंवा रिसेप्शनची पुष्टी केलेली नाही.

वलाई पेचूच्या अहवालानुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. लग्नानंतर हे जोडपे चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शनचे देणार आहे. तामिळनाडूच्या राजधानीतील एका पंचतारांकित हॉटेलला स्थळ म्हणून निवडल्याचे सांगितले जात आहे. रिसेप्शन सुरुवातीला १४ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र नंतरच्या अपडेटनुसार हा कार्यक्रम २१ नोव्हेंबरला होऊ शकतो. तारीख बदल करण्याचे कारण उघड अद्याप समोर आलेले नाही.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी केली पोस्ट

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवण्णा रेड्डी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. “सन ग्रुपचे अध्यक्ष श्री कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी श्रीमती कावेरी मारन यांनी माननीय मुख्यमंत्री श्री ए. रेवंथ रेड्डी यांची जुबली हिल्समधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना मुलगी काव्या मारनच्या लग्न रिसेप्शनसाठी आमंत्रित केले. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्न रिसेप्शनचे आयोजन चेन्नईमध्ये २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. #कलानिधीमारन #काव्यामारन” या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना देखील या लग्नाच आमंत्रण देण्यात आले आहे. अहवालानुसार लग्नाची पत्रिका आधीच पाठवण्यात आली आहे. मात्र पाहुण्यांच्या यादीची किंवा दोन्ही कार्यक्रमांच्या व्यवस्थांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

काव्या 33 वर्षांची असून अनिरुद्धपेक्षा ती दोन वर्षांनी लहान आहे. अनिरुद्ध हा 35 वर्षांचा आहे. अनिरुद्ध हा दाक्षिणात्य सुपरस्टार रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. त्याची आई लक्ष्मी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्याने रजनीकांत यांच्यापासून ते कमल हासन, ज्युनियर एनटीआर, थलपती विजय आणि अगदी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटापर्यंत अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिलं आहे. तो रजनीकांत यांचा नातेवाईक आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत.

अनिरुद्ध रविचंदर यांनी अलीकडे ‘जेलर २’साठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सॅकनिल्कनुसार शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटाने भारतात ३५.६० कोटी रुपये कमावले आहेत. त्याचे देशांतर्गत नेट कलेक्शन ९५.३० कोटींवर पोहोचले आहे, तर भारत ग्रॉस ११२.१० कोटी रुपये आहे. परदेशातील कमाईमुळेही कामगिरीला हातभार लागला आणि अहवालित जागतिक ग्रॉस २०९.१० कोटींवर पोहोचला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us